कोकण

मालवणात उद्या सत्कार सोहळा

CD

मालवणात उद्या सत्कार सोहळा
मालवण: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी (ता. २६) शहरातील महावितरणमधील वायरमन, लाईनमन यांचा सत्कार सोहळा सकाळी ११ वाजता येथील पक्ष कार्यालयात आयोजित केला आहे. तालुक्यातील महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम दुपारी ३ वाजता आयोजित केला आहे. तालुक्यातील सर्व उद्धव ठाकरे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, युवासेना, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केले आहे.
.............
मेमध्ये सामुदायिक विवाह सोहळा
सावंतवाडीः सिंधुदुर्ग जिल्हा सर्व धर्मीय विवाह सोहळा समिती सहाय्यक धर्मादाय आयुक्त एम्. एस. निकम यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र-मुंबई यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन ७ मे रोजी शरद कृषी भवन, सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथे केले आहे. विवाह सोहळ्यासाठी जोडपी निवडताना आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शहिद जवान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची मुले, बेघर, पारधी समाज, अपंग, गरीब व गरजू तसेच मागासवर्गीय मुले-मुली या घटकांचा विचार केला जाणार आहे. इच्छुक जोडप्यांचे आधारकार्ड, जन्मदाखला वा शाळा सोडल्याचा दाखला व ज्यांचे पालक हयात आहेत, त्यांचे संमतिपत्र आवश्यक आहे. इच्छुक जोडप्यांनी अधिक माहितीसाठी २० एप्रिलपर्यंत समितीचे कार्यवाह अशोक पाडावे (आचरा), अॅड. पुरावा ठाकूर (सहसचिव, मालवण), खजिनदार एल्. एम्. सावंत (सावंतवाडी) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले आहे.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT