Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Uddhav Thackeray: लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशात नेते, कार्यकर्ते कधी-कधी नकळत तर कधी-कधी मुद्दाम असे काही दावे करत असतात जे पूर्णपणे खोटे किंवा अर्धसत्य असतात.
Uddhav Thackeray Wardha Lok Sabha election rally 2024
Uddhav Thackeray Wardha Lok Sabha election rally 2024Esakal

लोकसभा निवडणुकीनिमित्त देशभरात प्रचाराचा धुरळा उडत आहे. अशात सर्वच पक्षाचे नेते, कार्यकर्ते कधी-कधी नकळत तर कधी-कधी मुद्दाम असे काही दावे करत असतात जे पूर्णपणे खोटे किंवा अर्धसत्य असतात.

आता असाच एक व्हिडिओ 'एक्स' (आधीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोलू न दिल्याचा दावा केला जात आहे. (Uddhav Thackeray Wardha Lok Sabha election rally 2024 Fact Check)

दावा

महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांचे 22 एप्रिल रोजी भाषण झाले.

दरम्यान या प्रचार सभेत काँग्रेस कार्यकर्ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलू देत नसल्याचा दावा करणारी पोस्ट एक्सवर करण्यात आली आहे. तसेच या पोस्टबरोबर एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

यावेळी ही पोस्ट करणारा युजर म्हणत आहे, "काय दिवस आले उद्धव ठाकरेंवर, ऐका रे ऐका रे मी पाच मिनिट बोलतो, तरी काँग्रेसवाले त्यांना बोलू द्यायला तयार नाहीत.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Uddhav Thackeray
Uddhav ThackerayEsakal
Uddhav Thackeray Wardha Lok Sabha election rally 2024
Fact Check: शिरूरमध्ये आढळराव-पाटलांना देवदत्त निकम यांनी पाठिंबा दिल्याचा दावा खोटा, वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

सत्य

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वर्ध्याची जागा महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाला देण्यात आली आहे. वर्ध्यातून शरद पवार गटाने माजी आमदार अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे. काळे यांच्या प्रचारार्थ 22 एप्रिल रोजी वर्धा येथे सभा झाली. या सभेला, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख उपस्थित होते.

दरम्यान, या सभेत सर्व नेत्यांची भाषणे झाली होती. उमेदवार अमर काळे यांच्या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार होते. असे असले, तरी सभेला उशीर झाला होता व उद्धव ठाकरे यांचे विमान येऊन थांबले होते.

ठाकरे यांचे भाषण व्हावे म्हणून स्टेजवरील काहींनी अमर काळे यांना थांबवण्याची विनंती केली. तेव्हा ठाकरे यांनी काळेंना बोलू द्यावे असे म्हटले. पण ठाकरे जाणार असल्याने उमेदवार अमर काळेंसह स्टेजवरील सर्वच कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांना भाषण करण्यासाठी आग्रह करू लागले.

या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्त ठाकरे, "मी पाच मिनिटे बोलतो असे म्हणाले."

ठाकरे यांच्या याच वाक्याचा अर्धवट व्हिडिओ शेअर करत काँग्रेस कार्यकर्ते ठाकरे यांना बोलू देईना झालेत असा दावा करण्यात येत आहे.

Uddhav Thackeray Wardha Lok Sabha election rally 2024
Fact Check: मुस्लिम मतदारांबद्दल चुकीच्या संदर्भासह 2022 चा फोटो व्हायरल

दरम्यान या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही रिव्हर्स सर्च इमेजचा वापर केला. तेव्हा आम्हाला 'साम'' टीव्हीने या संपूर्ण प्रकरणावर वृत्त प्रसिद्ध केल्याचे सापडले. 'साम'ने आपल्या यूट्यूब चॅनलवरुन या प्रसंगाचा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला आहे.

'साम' टीव्हीच्या या वृत्तात पूर्णपणे दिसत आहे की, माजी मुख्यमंत्री यांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचे होते. त्यासाठी त्यांचे विमान तयार होते. तर उमेदवार अमर काळे आणि त्यांचे सहकारी ठाकरे यांना भाषण करण्याची विनंती करत होते.

'साम' टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात त्यावेळी घडलेला सर्व घटनाक्रम चित्रित करण्यात आला आहे. यावरुन स्पष्ट होते की, अमर काळे यांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारे विरोध केलेला नव्हता.

निष्कर्ष

एक्सवर करण्यात आलेल्या दाव्यासंदर्भात सर्व गोष्टी तपासल्यानंतर यातून हे निष्पन्न होते की, वर्धा येथील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचार सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणताही विरोध केलेला नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com