कोकण

भरणेनाका येथे घरात आढळले 80 जीवंत गावठी बॉम्ब, दोघांवर गुन्हा

CD

पान १

९११७४
९११७५
91239


भरणेनाक्यात घरात ८० जीवंत बॉम्ब
दोघांवर गुन्हा; वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वापराचा संशय
खेड, ता. २४ ः शहरानजीक भरणेनाका येथे एका व्यक्तीच्या घरामध्ये तब्बल ८० जीवंत गावठी बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खेड पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, ही कारवाई गुरुवारी (ता.२३) सायंकाळी उशिरा खेड पोलिसांच्या पथकाने केली.
पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी भरणेनाका येथील एका संशयिताच्या घरी पोलिसांनी छापा मारला असता हा गावठी बॉम्बचा साठा मिळून आला आहे. या बॉम्बचा वापर हा वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी केला जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. खेडचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंदण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी बॉम्बचा साठा मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघा संशयिताला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, गेल्याच आठवड्यामध्ये तालुक्यातील खाडीपट्टा विभागात पन्हाळजे या गावी प्रमुख जिल्हा मार्गावरून एसटी बस जात असताना त्या बसच्या टायरखाली गावठी बॉम्ब फुटून मोठा आवाज झाला होता. या संदर्भात तक्रार झाली होती. त्यानुसार खेड पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास खोलवर खेड पोलिस करत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावरील प्रमुख गाव असलेल्या भरणे या गावातील एका घरात पोलिसांनी छापा टाकला. या वेळी एका घरात पोलिसांना एक दोन नव्हे तर तब्बल ८० हून अधिक घातक असे गावठी बॉम्ब सापडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT