कोकण

पशुसंवर्धनचे डॉ. विवेक पनवेलकर यांचे निधन

CD

फोटो ओळी
- rat२४p३८.jpg- KOP२३L९११८७डॉ. विवेक पनवेलकर
-------------

डॉ. विवेक पनवेलकर यांचे निधन
रत्नागिरी, ता. २४ ः जिल्हा परिषद पशु विभागात कार्यरत असलेले डॉ. विवेक पनवेलकर (वय ५३) यांचे शुक्रवारी (ता. २४) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रत्नागिरी तालुकाच नव्हे तर जिल्ह्यातील पशुंचे पालक म्हणूनच म्हणूनच त्यांची ओळख होती. हसतमुख अधिकारी हरपल्याने जिल्हा परिषद प्रशासनासह मित्रपरिवारातूनही हळहळ व्यक्त होत आहे.
डॉ. विवेक पनवेलकर हे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागात सुमारे २५ वर्षे कार्यरत होते. सध्या त्यांची नियुक्ती तालुका लघु पशू सर्व चिकित्सालयात सहाय्यक आयुक्त पशसंवर्धन या पदावर होती. रत्नागिरी येथील झाडगाव पशुवैद्यकीय दवाखान्यात ते कार्यरत होते. पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात त्यांचा हिरीरिने सहभाग असायचा. आतापर्यंतच्या त्यांच्या नोकरी कार्यकालात त्यांनी पशू पालकांना मोठा आधार दिला होता. ग्रामीण भागामध्ये स्वतः जाऊन पशूंची चिकित्सा आणि औषधोपचार करायचे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकर्‍यांमध्ये त्यांचे नाव होते. २०१५-१६ च्या दरम्यान जिल्हा परिषद येथे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक पदाचा प्रभारी कार्यभारही त्यांनी जबाबदारीने सांभाळला होता. त्यानंतर ते पुन्हा पशुवैद्यकीय विभागात कार्यरत झाले. ते सध्या रत्नागिरी शहरात माळनाका येथील वसंतविहार कॉम्प्लेक्स येथे राहत होते. शुक्रवारी सकाळी घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. वाटेतच त्यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्‍यांना मोठा धक्का बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT