कोकण

राहूल यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय दुर्दैवी

CD

राहूल गांधीच्या खासदारकी रद्दचा निर्णय दुर्दैवी

चिपळुणातील मतप्रवाह ; विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

चिपळूण, ता. २६ : कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. त्यासाठी भाजप काही दिवसांपासून प्रयत्न करत होते. हे सर्व जाणीवपूर्वक व ठरवून केलेले आहे. खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. त्यांच्या लोकप्रियतेला घाबरून भाजपने हा डाव साधला असल्याची प्रतिक्रिया चिपळूणमधील कॉंग्रेस कार्यकर्ते आणि काही नागरिक व्यक्त करत आहेत.
कॉंग्रेसचे शहरप्रमुख लियाकत शाह म्हणाले, एका व्यक्ती विरुद्ध केलेली टिप्पणी हा संपूर्ण ओबीसीचा अपमान असल्याचा कांगावा भाजपने चालवला आहे. हे असे असेल तर मग ओबीसींची जनगणना न होऊ देणे आणि गेले दोन वर्ष ओबीसींचा विश्वासघात करणारे देखील हेच प्रधान सेवक आहेत की नाही हे देखील भाजपने ओबीसी जनतेला सांगितले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते अशोक भुस्कुटे म्हणाले, राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीसाठी घातक आहे. न्यायालायने शिक्षा सुनावल्यानंतर अपिलात जाण्याची मुभा दिली असताना देशाचे नेतृत्व करमाऱ्या एका तरुण नेत्याविरूद्ध घाईघाईत करण्यात आलेल्या या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्याची गरज आहे. कॉंग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई म्हणाले, आजवर लोकशाहीची पायमल्ली भाजपकडून केली जात होती. मात्र राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करून आम्ही किती द्वेषी आहोत हे परत भाजपने सिद्ध केले आहे. अॅड जीवन रेळेकर म्हणाले, न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर निर्णयाविरूद्ध वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा नियमाला अनुसरून झालेला नाही. सुधीर दाभोळकर म्हणाले, खासदार राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालू झाल्याचे दिसत आहे.

..............मुझफ्फर खान...........................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT