कोकण

कणकवलीत मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल

CD

कणकवलीत मारहाण प्रकरणी
परस्परविरोधी फिर्यादी दाखल

२१ मार्चची घटना; दहा संशयितांवर गुन्हे

कणकवली,ता. २६ ः शहरात रंगपंचमीच्या दिवशी २१ मार्चला झालेल्या मारहण प्रकरणी आज परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी सुमीत मागती राणे (वय ३२ रा. कणकवली बांधकरवाडी) यांनी आज येथील पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी मनिष सावंत (वय २२), भावेश चव्हाण (वय २३), ऋषिकेश (वय २२), मेहबुब लदाफ (वय २३), मंगल सावंत (वय ५२) आणि समीर सावंत (वय २९, सर्व रा. कणकवली मधलीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी मनिष सावंत यांनी शनिवारी (ता.२५) फिर्याद दिली होती. यावेळी कणकवली-बांधकरवाडी येथील प्रणय मर्गज, सुमीत राणे, रजत राणे, अनिकेत म्हाडेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
सुमीत राणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कणकवली बांधकरवाडी येथे आपले घर आहे. त्या ठिकाणी मी, वडील श्रीधर राणे, आई माधवी, पत्नी सौ. निशा, मुलगा भावेश असे एकत्रित राहतो. मनिष सावंत, भावेश चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, मेहबुब लदाफ, समीर सावंत हे कणकवली-मधलीवाडी येथे राहतात. ते सर्व २१ मार्चला सायंकाळी पाचच्या सुमारास मी, वाडीत राहणारे माझे मित्र रजत रविंद्र राणे, अनिकेत दत्ताराम महाडेश्वर, प्रणय विठ्ठल मर्गज असे गावी कार्यक्रमासाठी कणकवली चव्हाटा मंदीर येथे रस्त्याचे डाव्या बाजूने जात होतो. मधलीवाडी येथे मनिष सावंत हा दुचाकीने आला. त्याच्यासोबत मागे भावेश चव्हाण, ऋषिकेश चव्हाण होते. आम्हाला हुलकावणी देवून जाताना त्यांच्या दुचाकी आरसा माझा मित्र रजतच्या उजव्या हाताला घासला, त्यावेळी आम्ही त्याला मनिष गाडी हळू चालव, असे बोललो. त्यावर मनिषने आम्हाला शिवीगाळ केली. तसेच मारण्यासाठी अंगावर धावून आला. तेव्हा भावेश चव्हाण, ऋषिकेश चव्हाण, मेहबुब लदाफ यांनी मला व माझे मित्र रजत, अनिकेत व प्रणय यांना मारहाण करून शिवीगाळ केली. आमची आरडाओरड ऐकूण मनिषची आई मंगल सावंत व समीर सावंत हेही घटनास्थळी आले. त्यांनीही रजत व अनिकेत यांना हाताने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT