कोकण

वीज बिल ऑनलाईन भरण्याला प्राधान्य

CD

rat२७१६.txt

बातमी क्र..१६ (टुडे पान २ साठी)

वीज बिल ऑनलाईन भरण्याला प्राधान्य

राजापूर विभाग; महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद

राजापूर, ता. २७ ः विविध सोयी आणि सुविधा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये वीज बिल भरण्यासाठीही ग्राहकांकडून ऑनलाईनला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील महावितरणच्या उपविभाग-१ मधील २६ हजार ३०० ग्राहकांपैकी सुमारे निम्म्याहून अधिक ग्राहकांकडून ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा केला जात आहे.
जानेवारी महिन्यात ११ हजार ९६४ ग्राहकांनी सुमारे ८० लाख ७५ हजार रुपयांचा बिल भरणा केला, तर फेब्रुवारीमध्ये ११ हजार ३११ ग्राहकांनी सुमारे ७२ लाख २४ हजार रुपयांचा ऑनलाईन पद्धतीने वीज बिल भरणा केला. तालुका विस्तारलेला असल्याने कामामध्ये सुसूत्रता यावी म्हणून वीज वितरण विभागाचे १ आणि २ असे दोन भाग केले आहेत. या दोन भागांमध्ये गावांचे विभाजन केले आहे. यापैकी विभाग १ मध्ये २६ हजार ३०० महावितरणचे विविध प्रकारचे ग्राहक आहेत. वीज बिल भरण्यामध्ये अधिक सुसूत्रता यावी आणि वसुली करणे अधिक सुलभ जावे या दृष्टीने वीज वितरण विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने बिल भरण्याचे आवाहन ग्राहकांना करण्यात येत आहे.
---------
चौकट ः
दृष्टिक्षेपात राजापूर भाग -१ ची ऑनलाईन वसुली

महिना एकूण ग्राहक ऑनलाईन भरणा केलेले ग्राहक ऑनलाईन बिल भरणा रक्कम
जानेवारी २०२३ २६ हजार ३०० ११९६४ ८० लाख ७५
फेब्रुवारी २०२३ २६ हजार ३०० ११३११ ७२ लाख २४
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : सिद्धार्थ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना ताप

SCROLL FOR NEXT