कोकण

कामथे ते खेरशत महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

CD

फोटो ओळी
-rat२७p३.jpg-
९१६६३
चिपळूण ः खेरशत येथे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या बाजूकडील काम सुरू आहे.
-rat२७p१४.jpg-
९१६९१
मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे वहाळफाटा येथील रखडलेले रस्त्याचे काम.
-rat२७p१५.jpg-
९१६९२
सावर्डे वहाळफाटा येथील रखडलेल्या या भराव ब्रिजला पाणी मारताना कामगार.
-
कामथे ते खेरशत महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

सावर्डेतील कामाची गती मंद ; व्यापाऱ्यांना फटका

संदीप घाग ः सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २७ ः मुंबई-गोवा येथील राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील कामथे ते खेरशत या ३० किमी. अंतराच्या टप्प्यातील रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सावर्डे बाजारपेठेत उड्डाणपूल की भराव ब्रिज यामुळे हे काम गेली अनेक वर्षे रखडले होते. अखेर ग्रामस्थांच्या संमतीने हे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू झाले असले तरी हे काम मंदगतीने सुरू असल्याने येथील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
सावर्डे ते आगवे व खेरशत ते आरवली हद्दीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कामथे ते खेरशत उर्वरित ३० किमी अंतराचे काम पूर्ण झाल्याने खेरशत ते चिपळूण हा प्रवास पावसाळ्यापूर्वी पूर्ववत विनाअडथळे सुरू होणार आहे. या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील शहरातील व छोट्या बाजारेपठेच्या ठिकाणातील अनेक तरुणांना स्वतःचा उद्योग जागेअभावी बंद करावा लागल्याने बेरोजगार होण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
सावर्डे येथील बाजारपेठ येथील काम भराव ब्रिज की उड्डाणपूल या भोवऱ्यात अडकले होते. व्यापाऱ्यांच्या दृष्टीने उड्डाणपूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी व व्यापारी संघटनेने आमदार शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले; मात्र ते असफल झाले. आमदार निकम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून भरावपूलही रद्द करून येथील बाजारपेठेचे अस्तित्व कायम ठेवण्यात यश मिळवले. त्यामुळे छोटे-मोठ्या उद्योग व्यावसायिकांना आधार मिळाला.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षणसंस्था, डेरवण रुग्णालय, मेडिकल कॉलेज, परिसरातील ५३ गावची मोठी बाजारपेठ असतानाही बाजारपेठेत गेली सहा महिने होऊनही काम पूर्णत्वास गेले नसल्याने व्यापाऱ्यांना फटका बसत आहे. सावर्डेपासून वहाळकडे जाणाऱ्या रोडपासून वावे येथे भरावब्रिजचे काम अपूर्ण असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. सावर्डे बाजारपेठ रस्त्याच्या दोन्ही बाजूला वसलेली आहे. या बाजारपेठेत दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड असून चारचाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था नाही. या रस्त्याची रुंदी जास्त असावी, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.
-
उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर
गेली अनेक वर्षे सावर्डे येथील चहाच्या टपऱ्या, वडापाव, भाजीवाले, शीतपेय आदी हातगाड्या लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे छोट्या व्यावसायिकांना जागाच नसल्याने पुरते बेरोजगार झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

-
कोट
सावर्डे येथील काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे; परंतु बाजारपेठेच्या भविष्याच्यादृष्टीने कामाचा दर्जा अधिक भक्कम करण्यात यावा. सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू केल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. बाजारपेठ मोठी असल्याने सर्व्हिस रोडची रूंदी आहे ती कायम ठेवावी, अशी मागणी राष्टीय महामार्ग मंडळाकडे केली आहे.
--समिक्षा बागवे, सरपंच, सावर्डे
---------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT