कोकण

पाडलोसमध्ये रेल्वे ट्रॅकवर अज्ञात तरुणाचा मृतदेह

CD

पाडलोसमध्ये रेल्वे ट्रॅकवर
अज्ञात तरुणाचा मृतदेह
बांदा, ता. २७ ः पाडलोस-भाकरवाडी परिसरात रेल्वे ट्रॅकवर काल (ता.२६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात युवकाचा मृतदेह आढळला. संबंधित तरुण हा २५ ते ३० वर्षे वयोगटातील असून तो रेल्वेतून खाली कोसळल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या युवकाचा घातपात की आत्महत्या याबाबतही साशंकता आहे. अद्यापपर्यंत त्याची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणी बांदा पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. अधिक माहिती अशी की, संबंधित तरुण हा परराज्यातील असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्याच्या खिशात मडगाव रेल्वे स्टेशनपर्यंतचे तिकीट सापडले. एक डायरीही आढळली; मात्र, त्यात पुरावासदृश्य कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही. त्यामुळे त्याची ओळख पटू शकलेली नाही. बांदा पोलिसांनी रविवारी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला. त्यासाठी रुग्णवाहिका चालक तथा इन्सुलीचे युवा कार्यकर्ते हेमंत वागळे यांनी पोलिसांना सहकार्य केले. त्यांच्यासह मध्यरात्री १०८ रुग्णवाहिकेच्या डॉ. अनघा बांद्रे, कर्मचारी दादा गवस, पोलीस हेड काँस्टेबल संजय हुंबे यांनी घटनास्थळी भेट दिली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी विच्छेदन केले. मृताच्या डोक्याला, छातीला जबर दुखापत झाली असून व्हीसेरा राखून ठेवल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT