कोकण

गुहागर ः साहिल आरेकर यांच्याकडे युवकांचे नेतृत्व

CD

फोटो ओळी
-rat३०p७.jpg ःKOP२३L९२३९५ साहिल आरेकर
-----------

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
जिल्हाध्यक्षपदी साहील आरेकर
गुहागर, ता. ३० ः राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्याध्यक्षपदी गुहागरमधील साहिल आरेकर यांची निवड झाली आहे. गेले अनेक दिवस रिक्त असलेल्या या पदासाठी जिल्ह्यातील ५ जण इच्छुक होते. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी युवक काँग्रेस संघटनेत काम केलेल्या साहील आरेकर यांनी निवड केली.
गुहागरमधील स्थापत्य अभियंता असलेल्या आरेकर यांनी तरुण वयातच सामाजिक काम, शैक्षणिक कामाला सुरवात केली. गुहागरचे माजी सभापती, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष लोकनेते स्व. सदानंद आरेकर यांच्या नावाने प्रतिष्ठान सुरू केले. या अराजकीय संस्थेद्वारे तालुक्यात अनेक उपक्रम राबवले. २०१९ मध्ये गुहागरमध्ये किनारा युवा महोत्सवाला सुरवात केली. या युवा महोत्सवातून तालुक्यातील युवकांना व्यासपीठ मिळवून दिले तसेच विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या युवकांना पुरस्कार देऊन गौरवही केला. आरेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही कौशल्य विकास आधारित शिक्षणसंस्था चिपळूणमध्ये सुरू केली. कोरोना संकटकाळात गोरगरीब कुटुंबांना धान्यवाटप केलेच शिवाय तालुक्यात विविध ठिकाणी पहारा देणाऱ्या पोलिसांना मास्क वाटप, पाण्याची व्यवस्था, भोजन व्यवस्था उभी केली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी आरेकर यांचे नाव बुधवारी (ता. २९) जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोकणचे नेते खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व युवक तालुकाध्यक्ष यांच्या शिफारशीने ही निवड झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT