कोकण

संक्षिप्त

CD

पान ५ साठी, संक्षिप्त

गुणदे निम्माईची उद्यापासून जत्रा
खेड ः तालुक्यातील गुणदे येथील श्री देव केदारनाथ, चंडिका, पद्मावती या ग्रामदैवतांची त्रैवार्षिक जत्रा १२ व १३ एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. बुधवरी (ता. १२) सकाळी ६.३० ला गणवाल येथे गणपत आंबरे, दिलीप आंबरे, योगेश आंबरे, विश्वास आंबरे यांनी दिलेल्या लाटेचे पूजन व लाट पाडणे, दुपारी १ ला महाप्रसाद, ३ ला लाटेचे मालकांकडून पूजन, ४ ला हनुमान नगर मंदिर येथे कापवाडी श्रीगणेश आगमन मंदिर येथे आगमन, संजय आंबरे व विक्रांत आंबरे यांच्या निवासस्थानी आगमन, आगमन, सायंकाळी ५.३० ला गुणदे ग्रामदैवत मंदिरकडे प्रयाण, ६ ला लाट चढवणे विधीवत कार्यक्रम, रात्री ८ ला संजय आंबरे यांच्या निवासस्थानी महाप्रसाद होणार आहे.

खेडच्या पोलिस अधिकाऱ्यांचा गौरव
खेड ः येथील पोलिस उपाधीक्षक शशिकिरण काशीद व प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. रत्नागिरीतील पोलिस मुख्यालयातील कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे मासिक गुन्हे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील पोलिस विभागातील विविध गुन्ह्यांमध्ये चांगली कामगिरी करणारे पोलिस अधिकारी व अंमलदारांना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. खेडचे उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, चिपळूणचे उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, खेडचे प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित गडदे, सावर्डेचे पोलिस निरीक्षक भरत धुमाळ आदींना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.

श्री देव माणेश्वर यात्रोत्सव २२ पासून
राजापूर ः तालुक्यातील करेल, निवेली, चव्हाणवाडी या तीन गावांचे जागृत देवस्थान श्री देव माणेश्वर यात्रा उत्सव व अक्षय्य तृतीया उत्सव शनिवारी (ता. २२) होणार आहे. या वेळी सकाळी ८ ला अभिषेक व मंत्रघोष १० ला सत्यनारायण महापूजा आरती, भजन व रात्री १० ला राजापूर देवाचे गोठणे, परवडीवाडी यांचा बहुरंगी नमनाचा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव माणेश्वर देवालय समिती चव्हाणवाडी, करेल, निवेलीतर्फे करण्यात आले आहे.

९४८८३
निरामय जीवनासाठी योग, प्राणायाम फायदेशीर
गुहागर ः जागतिक आरोग्य दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पालशेत क्र. १ आदर्श प्रशालेत प्राथमिक आरोग्य केंद्र, हेदवी व आरोग्य उपकेंद्र, पालशेत यांच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय विद्यार्थ्यांसाठी योग शिबिर झाले. या वेळी विद्यार्थ्यांना पतंजली योगपीठाच्या प्रशिक्षक अनुराधा दामले यांनी योगसाधनेचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना योगासनाचे प्रात्यक्षिक धडे दिले. निरामय जीवनासाठी योग प्राणायाम अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षकांनी या योग शिबिराचा लाभ घेतला. त्या वेळी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. उपशिक्षक बाबासाहेब राशिनकर यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षक संतोष गावडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकरांची चौकशी होणार? राजीनाम्यानंतर पक्षाकडूनही कारवाईचे संकेत, अडचणी वाढण्याची शक्यता

Satara ZP Violence : सातारा जिल्हा परिषदेत राडा! पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हाताला जखम; भाजप कार्यकर्त्यांवर धक्काबुक्कीचा गंभीर आरोप

बिग बॉस मराठीमधून जुने सदस्य नाही तर या वाईल्ड कार्ड एन्ट्रीची एक्झिट ! सदस्यांनाही बसला धक्का

गलतीसे मिस्टेक! एअर इंडियानं कॅनडात प्रवेशाला बंदी असलेलं विमान पाठवलं, ४ तासांनी समजली चूक; तोपर्यंत विमान....

Satara Police Action : पालकमंत्र्यांचाही आदेश झुगारला! साताऱ्यात पोलिसांनी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून कोणाला उचललं? हॉटेल रेडबटनवर रात्री 2 वाजता काय घडलं?

SCROLL FOR NEXT