टेम्पोची दुचाकीला धडक
रत्नागिरी ः शहरातील एमआयडीसी मिरजोळे येथील एमएसईबी वर्कशॉप लगत असलेल्या चौकात टेम्पोने दुचाकीला धडक दिली. या अपघातातील टेम्पो चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सकाळी पावणेनऊ च्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक मिरजोळे लक्ष्मीकांतवाडी ते गद्रे कंपनी रस्त्यावर निष्काळजीपणे टेम्पो चालवून दुचाकीला धडक दिली. यामध्ये स्वाराला किरकोळ दुखापत झाली. याप्रकरणी स्वाराने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.
दारु विक्रीप्रकरणी महिलेवर गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील जांभारी येथे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू विक्री करणाऱ्या महिलेविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. १६) सव्वा तीनच्या सुमारास जांभारी-विठ्ठलवाडी येथील जंगलमय परिसरात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित महिला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीसाठी स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडली. याप्रकरणी पोलिसांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोफळी येथून तरुण बेपत्ता
चिपळूण ः तालुक्यातील पोफळी सय्यदवाडी येथून तरुण घरातून निघून गेला तो अद्याप आलेला नाही. नातेवाईकांनी या प्रकरणी शिरगाव अलोरे पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. हुसेन अमीन पटेल (वय 32) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुसेन हा विवाहित आहे. १ एप्रिलला दुपारी १२ वाजता घरातून निघून गेला. तो अद्याप घरी आलेला नाही. घरच्या लोकांनी नातेवाईक तसेच मित्रमंडळींकडे चौकशी केली. मात्र हुसेन कुठेच आढळून आला नाही. या प्रकरणी पत्नी मेहरुन्नीसा हुसेन पटेल हिने पोलिस ठाण्यात खबर दिली. खबरीवरुन पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे. हुसेन कोणालाही दिसून आला तर शिरगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.