कोकण

सफाई कामगारांचे मानधन थकले; आजपासून काम बंद

CD

सफाई कामगारांचे मानधन
थकले; आजपासून काम बंद

दोडामार्ग नगरपंचायत प्रशासनाला निवेदन

दोडामार्ग, ता. १७ ः कसई-दोडामार्ग नगरपंचायतच्या सफाई कर्मचारी व नळ कामगारांचे दोन महिन्यांचे मानधन थकले आहे. त्यामुळे उद्यापासून (ता.१८) बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, येथील नगरपंचायतचे सर्व सफाई कर्मचारी व नळ कामगार यांना फेब्रुवारी व मार्चपर्यंतचे मानधन मिळालेले नाही. दोन महिन्यांपासून नगरपंचायत कार्यालयात वारंवार पाठपुरावा करण्यात आला; मात्र नगरपंचायतीकडून त्याची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. मानधन न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांचे मानधन न मिळाल्यास बेमुदत काम बंद करणार असल्याचा इशारा या कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला. तसे निवेदन रामदास शेळके, बाबू ताटे, सोमनाथ वरक, अरुण चव्हाण, अंकुश कदम, सुनील आरोसकर व मंदार चव्हाण यांनी दिले आहे.
----------
चौकट
नगरसेवक नानचेंनी वेधले लक्ष
नगरपंचायतीत कार्यरत असलेले सफाई व नळ कामगार अत्यंत चांगले काम करीत आहेत. दोडामार्ग शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी चाललेले प्रयत्न यशस्वी ठरत आहेत; परंतु, शहर सुंदर राहण्यासाठी दिवस-रात्र राबणाऱ्या हातांवर मात्र वेळेत वेतन मिळत नाही. रोज सफाई करणाऱ्यांना तीन-चार महिने वेतन मिळत नाही. ही नगरपंचायतसाठी अशोभनीय गोष्ट आहे. कामगारांच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने जीवितार्थ जलविणे मुश्किलीचे होत आहे. त्यामुळे कामगारांचे थकीत वेतन ताबडतोब अदा करावे. तसेच यापुढेही त्यांचे वेतन वेळेवर द्यावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष नानचे यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT