कोकण

उष्म्याने सिंधुदुर्ग हैराण

CD

उष्म्याने सिंधुदुर्ग हैराण
ढगाळ वातावरणाची भर; पारा ३८ अंशापर्यंत
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १९ ः सिंधुदुर्गात वाढलेल्या उष्म्याने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यातच ढगाळ वातावरणामुळे अधिक घुसमट होत आहे. आज सायंकाळी उशिरा जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात पावसाचे वातावरण होते. दरम्यान, प्रशासनाने उष्माघातापासून बचावासाठी विविध उपाययोजना सुचविण्याल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. गेले दोन-तीन दिवस ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होते. आज देखील जिल्ह्यात सरासरी ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. वाढलेल्या उष्म्याने अगांची अक्षरशः लाही लाही होत आहे. सकाळी दहानंतर शेती किंवा श्रमाची कामे करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्याच्या सर्वच भागात ही स्थिती आहे. उष्म्याचा प्रचंड त्रास जाणवत असताना आज सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे अधिकच घुसमट जाणवू लागली. काही भागात पावसाचे वातावरण तयार झाले. वाऱ्याचा वेग देखील काहीसा वाढला; परंतु रात्री उशिरापर्यंत कुठेही पाऊस पडला नव्हता.
वाढलेल्या उष्म्यामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगावी, यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय सुचविले आहेत. सार्वजनिक ठिकाणी पुरेसे पाणी, पंखे सुरू राहतील, अशी व्यवस्था करण्याच्या सूचना विविध विभागांना दिल्या आहेत. शेतकरी किंवा विविध श्रमाची कामे करणाऱ्या कर्मचारी, कामगारांनी सकाळी लवकर कामे करावीत, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

उपाय
* महाविद्यालये सकाळच्या सत्रात
* वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षत घ्यावी
* बाजार समिती, धार्मिक स्थळे, यात्रा ठिकाणांवर

जिल्ह्यात आज तापमानात किंचित घट झाली. उद्या त्यात आणखी घट होईल. येत्या दोन-तीन दिवसांत परिस्थिती बदलण्याचे संकेत आहेत. ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता नाही.
- डॉ. यशवंत मुठाळ, तांत्रिक अधिकारी, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT