कोकण

काळसे ग्रामपंचायत विकास निविदा

CD

काळसे ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः मालवण तालुक्यातील काळसे ग्रामपंचायतच्या वतीने विकास निविदा जाहीर केली आहे. गावातील गोविंद अर्जुन चव्हाण ते महादेव सरमळकर यांच्या शेतातून जाणारी पायवाट बांधणे यासाठी एक लाख ४६ हजार ९७४ रुपये निधी पंधराव्या वित्त आयोगातून मंजूर केला आहे. या कामाची मुदत ३१ मे पर्यंत आहे. मान्यता प्राप्त ठेकेदारांना पोट मक्ता देण्यात येणार आहे. यासाठी मक्तेदारांनी सीलबंद लकोट्यातून निविदा २८ एप्रिल पर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावयाची आहे. अटी व शर्तीची माहिती ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध आहे असे सरपंच ग्रामपंचायत काळसे यांनी कळवले आहे.
------------
सोनाळी ग्रामपंचायत विकास निविदा
कणकवलीः वैभववाडी तालुक्यातील सोनाळी ग्रामपंचायतीच्या वतीने विविध हेडखाली लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या, पंधराव्या वित्त आयोगातून किंवा ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामाची निवेदन जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सोनाळी गावठणवाडी शेलार यांच्या घराशेजारी नदीपात्रात संरक्षण भिंत बांधणे ९ लाख ९९ हजार ७३६ रुपये तसेच सोनाळी वानीवाडी येथे पाटपायऱ्या व संरक्षण भिंत बांधणे पंधरावा वित्त आयोगतून ४२ हजाक ९६६ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मान्यता प्राप्त ठेकेदारांना २७ एप्रिल पर्यंत निविदा सीलबंद लिपाफ्यामध्ये सादर करावयाची आहे. काम पूर्ण झाल्यावर ग्रामपंचायत कमिशन, आयकर व इतर शासकीय कपाती पूर्ण केल्या जातील. काही कारणास्व निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीने राखून ठेवले आहेत असे ग्रामसेवक ग्रामपंचायत सोनाळी यांनी निविदेत नमूद केले आहे.
---------------
कणकवली बांधकामकडून विकास निविदा
कणकवलीः सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्याकडून नोंदणीकृत ठेकेदारांकरीता ई - निविदा प्रणाली मार्फत निविदा जाहीर केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक इमारतीमधील अस्तित्वातील स्लॅबच्या छतावर प्रिकोटेड पत्रे बसवणेयासाठी ४१ लाख ४७ हजार १८२ रुपये निधी मंजूर केला आहे. कणकवली तालुक्यातील करंजे कुंभारवाडी सातवसेवाडी, नारकरवाडी उगवाई नदीवर साकव बांधकाम करणेसाठी ४९ लाख ५५ हजार ६११ रुपये मंजूर केले आहेत. ई- निविदा ४ मे पर्यंत डाऊनलोड करून भरणा करावयाची आहे. प्राप्त झालेल्या निविदा ८ मे रोजी रत्नागिरी येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात ऑनलाईन पद्धतीने उघडण्यात येणार आहेत असे सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या निविदेत नमूद केले आहे.
------------
सावंतवाडी बांधकामकडून विकास निविदा जाहीर
कणकवली,ता. २० ः सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोंदणीकृत तांत्रिक वर्गीकरण असलेल्या मजूर सहकारी संस्थांसाठी ई- निवेदन जाहीर केली आहे. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर डाऊनलोड करण्यात यावीत. तसेच निविदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम सावंतवाडी यांनी राखून ठेवला आहे. यामध्ये तेरसे - बाबार्डे, काजरावाडी नागवेकरवाडी ओहळार साकव बांधणे (ता. कुडाळ) यासाठी २१ लाख ४४ हजार रुपयेचा निधी मंजूर केला आहे. सोनवडे तर्फे हवेली बळीचे टेम येथे साकव बांधकाम करणे (ता. कुडाळ) यासाठी १७ लाख १० हजार रुपये, वेंगुर्ले तहसील कार्यालया अंतर्गत रस्त्याचे खडीकरन व डांबरीकरण करणे १६ लाख ४० हजार तर सावंतवाडी रेडी रस्त्यावर महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीची गॅस पाईपलाईन टाकल्यानंतर खराब झालेल्या रस्ता पूर्ववत करणेसाठी २४ लाख ९६ हजार रुपये निधी मंजूर केला आहे. ही ई- निविदा ४ मे पर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरणा करता येणार आहे. निविदा ८ मे रोजी बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्या कार्यालयात उघडून प्रक्रयी पूर्ण केली जाईल असे सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी यांच्याकडून निवेदित नमुद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT