कोकण

रत्नागिरी-टुडे पान 1 साठी, संक्षिप्त पट्टा

CD

निरायमयतर्फे झरीविनायकजवळ
दर शनिवारी मोफत योग शिबिर
रत्नागिरी ः रत्नागिरीतील निरामय योगा संस्था पतंजलीचे मुख्य प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय योग प्रशिक्षक विरू स्वामी यांच्यातर्फे रत्नागिरीतील साधकांसाठी दर शनिवारी पहाटे साडेपाच ते साडेसात या वेळेत शहरातील झरी विनायक भाट्ये येथे, निःशुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे नाडी परीक्षण करून सर्व आजाराचे निदान करणे, रोगानुसार योग प्रशिक्षण तसेच अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल या पंचतत्त्वाच्या सान्निध्यात योग करण्याचा आनंद घेता येणार आहे. या वेळी सर्व वयोगटासाठी विशेष मार्गदर्शन आयोजित केले आहे. शहरातील साधकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन योग प्रशिक्षक विरू स्वामी यांनी केले आहे.
--------

जिल्हा परिषद अनुकंपा तत्त्वाची
प्रतीक्षा यादी जाहीर
रत्नागिरी ः जिल्हा परिषद, रत्नागिरीअतंर्गत ३१ मार्च २०२३ अखेर अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळण्यासाठी प्राप्त झालेल्या परिपूर्ण, अपूर्ण व अपात्र अर्जांची तात्पुरती प्रतीक्षा यादी जिल्हा परिषदेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी रत्नागिरी जिल्हा परिषद कार्यालयाच्या www.zpratnagiri.org व रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.ratnagiri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. यादीमधील अनुकंपा उमेदवारांच्या माहितीची खातरजमा करून त्यामध्ये काही हरकती असल्यास २४ एप्रिलपर्यंत सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे योग्य त्या कागदपत्रांसह सादर कराव्यात. २४ एप्रिलनंतर प्राप्त हरकतींचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले.
-------
आपत्ती व्यवस्थापनाची
चिपळुणात आज बैठक
चिपळूण ः शहरात पावसाळ्यात निर्माण होणारी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन पालिकेने शुक्रवारी (ता. २१) सकाळी साडेअकरा वाजता आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली आहे. पालिका सभागृहात प्रशासक तथा प्रभारी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बैठकीस पोलिस, वैद्यकीय व महसूल अधिकाऱ्यांसह पालिकेचे विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन पूर्वतयारीचा आढावा घेतला जाणार आहे. चिपळूण शहरात दरवर्षी पाणी भरते. वाशिष्ठी नदीतील गाळ काढल्यामुळे मागील वर्षापासून पूराची तीव्रता कमी झाली आहे. मात्र पूर येणार नाही असे गृहित न धरता पालिकेने संभाव्य पुरावर मात करण्यासाठी उपायोजना सुरू केल्या आहेत. पालिका कर्मचारी शहरातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

Hemant Soren : हेमंत सोरेन यांना धक्का! ईडी कोर्टाने फेटाळला जामीन अर्ज; काय आहे प्रकरण?

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी लातूरमधील उदगीर येथे दाखल

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

SCROLL FOR NEXT