कोकण

-राजापूर शिक्षण मंडळाच्या इंग्रजी शाळेच्या वास्तूचे भूमिपूजन

CD

१२ (पान २ साठी)


-rat२२p९.jpg ः
९७७६०
राजापूर ः नव्या वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यावेळी धार्मिक विधी करताना व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर.
---

राजापूर शिक्षण मंडळाच्या इंग्रजी शाळेचे भूमिपूजन

राजापूर, ता. २२ ः राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये शिकणे, हे भाग्यकारक असून माझी दोन्ही मुले राजापूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेमध्ये शिकून मोठी झाली आहेत. आंबेवाडीसारख्या निसर्गरम्य परिसरात संस्थेच्या इंग्रजी माध्यम शाळेची नवीन वास्तू उभी करण्यात येत असून नवी वास्तू दिमाखात उभी राहण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे प्रतिपादन अ‍ॅड. प्रकाश रानडे यांनी केले. या वेळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या नव्या वास्तूच्या उभारणीचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या सोहळ्याला राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यवाह प्रकाश भावे, कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षा डॉ. छाया जोशी, संस्था विश्वस्त डॉ. बी. डी. पाध्ये, माजी विश्वस्त दिलीपशेठ पाटणकर, प्रमोद अभ्यंकर, मानसी हजेरी, संस्थेचे पदाधिकारी जगदीश पवार, अभय मेळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी भावे म्हणाले, सुमारे १६ महिन्यांपूर्वी मुख्य इमारत जतन संवर्धन काम सुरू करताना संस्थाध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि आम्ही थोडे साशंक होतो; पण राजापूर हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी भरघोस देणगी दिल्याने आम्ही संपूर्ण इमारतीचे जतन संवर्धनाचे काम एका वर्षात पूर्ण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : शरद पवार आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावर, काय आहे कारण?

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT