कोकण

गौतमी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा

CD

पान ५ साठी)

९८३०३


गौतमी नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा
कामाला सुरुवात ; दोन कोटीचा खर्च, पाणी योजनांना फायदा
पावस, ता. २४ ः पावसची भाग्यरेषा असलेल्या गौतमी नदीवर जलजीवन मिशन अंतर्गत कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उभारणीला सुरुवात झाली आहे. यामुळे या परिसरातील विहिरीला पावसाळा संपल्यानंतर पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होणार आहे.
गौतमी नदी व महाविष्णू पऱ्या यांच्या संगमावर जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत दोन कोटी रुपये खर्च करून कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचे काम सुरू झाले. पावस ग्रामपंचायत आराखड्यामध्ये जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत साडेचार कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये अनेक विहिरींची व पाईपलाईनची दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. त्यातील दोन कोटीचा निधी गौतमी नदीवर बंधाऱ्यासाठी खर्च करण्यात येणार आहे. कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याने त्याला झडपे असणार आहेत. पावसाळ्यामध्ये झडपे काढून ठेवण्यात येणार असून पाऊस संपल्यानंतर नदीचे पाणी कमी झाल्यावर झडपे लावण्यात येणार आहे. यामुळे या परिसरात असलेल्या नळ पाणी योजनेच्या विहिरीला त्याचा चांगला फायदा होणार आहे. बंधाऱ्याच्या बांधकामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असून ३० मीटर लांबीचा बंधारा बांधण्यात येणार आहे. बंधाऱ्यामुळे सुमारे एक किमीपर्यंत पाणलोट क्षेत्र राहणार आहे. त्यामुळे पाण्याची पातळी स्थिर राहणार असल्याने टंचाई काळात या पाण्याचा उपयोग होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: 'मुलाने गाडी चालवायला मागितली तर दे', विशाल अग्ररवालने दिलेली सूचना; ड्रायव्हरने जबाबात दिली माहिती

Vicky Kaushal & Katrina Kaif : "घरच्यांचा दबाव..."; कथित प्रेग्नेंसीमुळे विकीची 'ती' मुलाखत पुन्हा चर्चेत

RR vs RCB Eliminator Live : सलग सहा सामने जिंकणारी आरसीबी 11 दिवस न खेळणाऱ्या राजस्थानवर पडणार भारी?

North Mumbai: उत्तर मुंबई मतदारसंघात कमी मतदानाचा फटका बसणार? आयोगाचा गोंधळ जबाबदार?

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्रालय बॉम्बनं उडवण्याची धमकी! फोन कॉलनं खळबळ

SCROLL FOR NEXT