कोकण

ग्रामीण मुले तंत्रज्ञानातही पुढे हवेत

CD

98407
कनेडी ः येथील माध्यमिक विद्यामंदिरातील आयोजित बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी.

ग्रामीण मुले तंत्रज्ञानातही पुढे हवेत

सागर सावंत; कनेडी प्रशालेत ‘बेसिक रोबोटिक्स निर्मिती’

कणकवली,ता.२५ ः ग्रामीण भागातील विद्यार्थी तंत्रशिक्षणातही पुढे जावेत आणि या सर्धेच्या युगामध्ये टिकून राहून स्वतःचा, गावाचा, जिल्ह्याचा विकास करावा, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक सागर सावंत यांनी कनेडी येथे केले. ज्या मातीत आपण जन्मलो, त्या मातीचे आपण कायम ऋणी असतो, हे ऋण फेडण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत, असेही श्री. सावंत यांनी यावेळी नमुद केले.
आपल्या परिसरातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांनी तंत्रशिक्षणात प्रगती करून नावलौकिक करावा, यासाठी बेसिक रोबोटिक्स निर्मिती कार्यशाळा आयोजित केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच माध्यमिक विद्यामंदीर कनेडीच्या ज्ञानदीप सांस्कृतीक भवनामध्ये ही कार्यशाळा झाली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मानंद सुदास घारपुरे, लक्ष्मी आनंद धारपुरे होते. आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले की, स्वतःच्या जबाबादारीची जाण ठेवून आपल्या मुलांसाठी सागर सावंत आणि त्यांचे सहकारी हे कार्य करीत आहेत. ते काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. भविष्यात माध्यमिक विद्यामंदीर कनेडी हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे बेसिक रोबोटिक्स निर्मितीचे केंद्र बनावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. यावेळी संस्था उपाध्यक्ष पी. डी. सावंत, सदस्य व्ही. बी. सावंत, शालेय समिती चेअरमन आर, एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, सदस्य प्रभाकर चांदोस्कर, कावेरी सावंत, प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते. दोन दिवसांच्या या कार्यशाळेत विविध प्रयोग आणि प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT