कोकण

अन् अपघातग्रस्त वळण चकाचक!

CD

लोगो ः विधायक
---
98408
कनेडी ः सांगवे येथील तिव्र वळणावरील झाडी, झुडपे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून हटविली.

अन् अपघातग्रस्त वळण चकाचक!

सांगवे उतारावील चित्र; ठाकरे गटातर्फे स्वखर्चातून स्वच्छता मोहीम

कणकवली,ता.२५ ः सागंवे पामतले येथील तिव्र उतारावरील वारंवार होणाऱ्या अपघाताल रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे आणि झुडपे होती; मात्र, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नाटळ - हरकुळ विभागीय शिवसेना शाखा कनेडीच्या कार्यकर्तांनी स्वखर्चातून या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली आहे. त्यामुळे या कार्यकर्त्यांचे वाहन चालकांनी कौतुक केले आहे.
कणकवली ते कनेडी हा नरडवे असा राज्यस्तरीय रस्ता आहे. या रस्त्यावर दिवसरात्र वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्या रविवारी २३ एप्रिल रोजी सांगवे कनेडी पामतेल येथील उतारावर अपघात झाला होता. रिक्षाला मोटारीची धडक बसल्याने झालेल्या अपघातात तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. तिव्र उतारावरील रस्त्याच्या कडेला वाढलेल्या झुडपांमुळे समोरून येणारे वाहन चालकाला दिसत नव्हते. या अपघाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना (ठाकरे गट) नाटळ -हरकुळ बुद्रुक विभागीय शिवसेना शाखा कनेडी येथील कार्यकर्ते मुकेश सावंत, तुषार गावकर, राजू पाटील या तरूणांनी अपघात क्षेत्राच्या ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला वाढलेले रान, झाडे-झुडपे तोडून हा परिसर स्वच्छ केला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचे असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते.
०००
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ज्या ज्या ठिकाणी अशी तीव्र वळणे आहेत. त्या त्या ठिकाणची स्वच्छता पीडब्ल्यूडी कर्मचाऱ्यांकडून होणे गरजेचे आहे; पण अशा ठिकाणी बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अपघातात जीवितहानी होते. गाड्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे अपघातास कारणीभूत असलेल्या तिव्र वळणावरील सफाई शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक काम म्हणून स्वखर्चाने आणि श्रमदानातून केली. त्यांच्या या मोहीमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. येत्या काळात मुंबईचे चाकरमानी या परिसरात मोठ्या संख्येने येणार आहेत. अनेक चाकरमानी खासगी गाड्यांनी येतात. त्यामुळे या नरडवे रस्त्यावरील वाहनांची वर्दळ पुढील महिनाभर मोठ्या संख्येने वाढणार आहे. तरूणांच्या या स्वच्छता मोहीमेचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT