कोकण

मालवणात आजपासून गाबित महोत्सव

CD

98696
मालवण ः गाबित समाज महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत परशुराम उपरकर यांनी माहिती दिली.
(छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)

मालवणात आजपासून गाबित महोत्सव

तयारी पूर्ण; तीन राज्यांतील समाजबांधवांना आमंत्रण

मालवण, ता. २६ : अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, महाराष्ट्र राज्य गाबित समाज व सिंधुदुर्ग जिल्हा गाबित समाज यांच्यावतीने येथील दांडी किनाऱ्यावर उद्यापासून (ता. २७) चार दिवसीय गाबित महोत्सव होत आहे. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तीन राज्यांतून गाबित बांधव सहभागी होणार आहेत. विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल या महोत्सवात आहे. हा महोत्सव केवळ मनोरंजनात्मक न राहता महोत्सवातून गाबित बांधवांना एकत्र आणतानाच व्यवसाय उद्योग व नोकरीच्या संधीबाबत मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे हा महोत्सव गाबित समाजाला दिशादर्शक ठरेल, असा विश्वास अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
येथील गाबित महोत्सव कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी अखिल भारतीय गाबित समाज महासंघ, मुंबईचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबित समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबित समाज सिंधुदुर्ग अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, सिंधुदुर्ग कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक रविकिरण तोरसकर, दिगंबर गावकर, संजय बांदेकर, अशोक तोडणकर, प्रवीण सरवणकर, प्रविणा सरवणकर, पूजा सरकारे, अन्वय प्रभू, रुपेश प्रभू, सन्मेश परब, नरेश हुले, लक्ष्मीकांत खोबरेकर, जितेंद्र शिर्सेकर यांसह अन्य पदाधिकारी, गाबित समाज बांधव उपस्थित होते.
श्री. उपरकर म्हणाले, ‘‘महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्या गाबित बांधव मच्छिमारी, मत्स्य विक्री व वॉटरस्पोर्ट्स व्यवसाय बंद ठेवून या महोत्सवाच्या शुभारंभात सहभागी होणार आहेत. सकाळी दहाला मामा वरेरकर नाट्यगृह येथे रांगोळी स्पर्धा होणार आहे. सायंकाळी पाचला फोवकांडा पिंपळ येथून दुचाकी रॅली निघणार आहे. साडेपाचला मोरयाचा धोंडा येथून श्री देव दांडेश्वरपर्यंत भव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील कलाकार आणि मावळे असा ऐतिहासिक सोहळा साकारला जाणार आहे. याच वेळी समुद्रातून सजावट केलेल्या आणि मशाली व झेंडे लावलेल्या नौकांची मिरवणूकही निघणार आहे. सायंकाळी सहाला दांडी येथे महोत्सवाच्या ठिकाणी या नौकांचे स्वागत झाल्यावर गाबित महाज्योतीचे प्रज्वलन व गाबित महोत्सवाचे उद्‍घाटन होणार आहे. साडेसहाला गाबित भूषण पुरस्कार प्रदान सोहळा व गाबित सन्मान सत्कार कार्यक्रम, क्रिकेट स्पर्धा व होडी सजावट स्पर्धा, बक्षीस वितरण होणार आहे. रात्री आठला इतिहास संशोधक अमर आडके यांचे गाबित समाज व शिवकाल संबंधी भाषण, रात्री नऊला गाबित समाजाचा शिमगोत्सव सादर होणार आहे. २८ ला सकाळी साडेआठला दांडी किनारी रापण प्रात्यक्षिक दाखविणे, शेंडी पागून मासे पकडणे स्पर्धा, गरवून मासे पकडणे प्रात्यक्षिक होणार आहे. दहाला मामा वरेरकर नाट्यगृह येथे मत्स्य संपदा व सिंधुरत्न योजना, किमान कौशल्य विकास व रोजगार योजना, मत्स्य उद्योग, बँक कर्ज प्रकरणे याबाबत माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. दांडी येथे सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत गाबित समाजाचे जिल्हास्तरीय कार्यक्रम, सागरी सुंदरी स्पर्धा, गाबित भूषण पुरस्कार व सन्मान प्रदान कार्यक्रम होणार आहे. २९ ला सकाळी १० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन, जलक्रीडा, जात पडताळणी, बँक योजना याविषयी मार्गदर्शन, बाराला ‘मच्छीमार समाज व मानव साधन विकास’, या विषयावर प्रा. नंदकिशोर परब यांचे व्याख्यान होणार आहे. तर सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत दांडी येथे स्थानिक कलाकारांचे गुणदर्शनपर कार्यक्रम, शेंडी पागणे मासेमारी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण, गाबित भूषण पुरस्कार वितरण व सन्मान, रात्री ९ वाजता मुंबईतील प्रसिद्ध कलाकारांचा नृत्याविष्कार कार्यक्रम होणार आहे.
दरम्यान, या महोत्सवासाठी दांडी येथील मुख्य स्टेजमधील व्यासपीठास मच्छिमार नेते (कै.) ज्ञानेश देऊलकर व्यासपीठ व सभागृहास माजी उपनगराध्यक्ष सुबोध आचरेकर सभागृह, मामा वरेरकर नाट्यगृह सभागृहास (कै.) अरविंद हुले सभागृह व व्यासपीठास (कै.) हिरोजी तोडणकर गुरुजी व्यासपीठ अशी नावे दिली आहेत. परिसंवादही होणार आहे. महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष उपरकर, राज्य गाबित संघांचे अध्यक्ष धुरत, जिल्हा गाबित समाजचे अध्यक्ष उपरकर यांनी केले.
---
नौकानयन, जलतरण स्पर्धा रविवारी
३० ला सकाळी साडेआठला दांडी किनारी नौकानयन व जलतरण स्पर्धा, सकाळी दहाला गाबित समाजातील वकील, डॉक्टर्स, इंजिनियर, उच्च शिक्षित आणि उद्योजक यांचा परिसंवाद, दुपारी बारा ते तीन महिलांसाठी पाककला स्पर्धा व प्रात्यक्षिके, सायंकाळी ५ ते रात्री आठ दांडी येथे स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, गाबित भूषण सन्मान, जलतरण, पाककला स्पर्धा बक्षीस वितरण, रात्री नऊला मुंबईतील प्रसिद्ध नृत्यांगना, सेलिब्रेटी यांचा ऑर्केस्ट्रा सादर होऊन या महोत्सवाची सांगता होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT