कोकण

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे ओटवणेत रविवारी आयोजन

CD

जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे
ओटवणेत रविवारी आयोजन
ओटवणे, ता. २६ ः सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध दशावतार हार्मोनियम वादक (कै.) सुभाष परब यांच्या स्मरणार्थ रविवारी (ता. ३०) जिल्हास्तरीय निमंत्रितांच्या पुरुष आणि महिला गट खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या दोन्ही गटातील भजन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ८ भजन संघांना निमंत्रित केले आहे. स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी जिल्ह्यातील प्रसिद्ध पखवाज विशारद डॉ. दादा परब यांचा पखवाज सोलो व ढोलकी वादनाचा कार्यक्रम होणार आहे.
भजन स्पर्धेच्या पुरुष गटासाठी विघ्नेश्वर मंडळ (बावळाट, बुवा नारायण सावंत), श्री सनाम देव (सांगेली, बुवा खेमराज सनाम), रवळनाथ प्रसादिक (पाडलोस, बुवा अजित गावडे), भवानी प्रासादिक (न्हावेली, बुवा अक्षय जाधव), तर महिला गटासाठी श्री दादरेकर प्रासादिक (तुळसुली, बुवा अंतरा सावंत), अभंग महिला भजन मंडळ (कुडाळ, बुवा कोमल पावसकर), श्री ब्राह्मण देव प्रासादिक (आडेली, बुवा वैशाली कोंडुस्कर), श्री सिद्धेश्वर प्रासादिक (खानोली, बुवा आकांक्षा खानोलकर) मंडळांना निमंत्रित केले आहे. दोन्ही गटातील विजेत्या भजन मंडळांना अनुक्रमे ५३३३, ३३३३ रुपये, दोन्ही गटातील प्रत्येकी एका भजन मंडळाला दशावतार स्वरानंद पुरस्कार आणि राजयोग लक्ष्मी पुरस्कार या विशेष पुरस्कारांसह प्रत्येकी २०२३ रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT