कोकण

रत्नागिरी ः पावरा पतीपत्नीने सीईओंपुढे वाचला आरोपांचा पाढा

CD

पावरा दांपत्याने सीईओंपुढे वाचला तक्रारींचा पाढा

१ मे रोजी जिल्हा परिषदसमोर आंदोलन ;अनेक कागदपत्रे गायब झाल्याचा दावा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः तत्कालीन शिक्षणाधिकारी व आदिवासी महिलेला त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करा, माझी २ मुळ कागदपत्रे २ लाख दंडाच्या रकमेसह परत करा, अशा २८ मागण्यांसाठी बिरसा फायटर्सचे १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद रत्नागिरीसमोर ठिय्या आंदोलन होणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलिस निरीक्षक शहर पोलिस ठाणे रत्नागिरी यांना निवेदन देण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांना बडतर्फ करतो तसा तक्रारअर्ज मला द्या, असे जिल्हा परिषद रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार यांनी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा व पिंगला पावरा यांना २५ एप्रिलच्या भेटीदरम्यान आश्वासन दिले आहे, असा दावा पावरा यांनी केला आहे.
माझ्या प्रकरणातील अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी सूडबूद्धीने माझ्या पत्नीला जिल्हा परिषद रत्नागिरीत बोलावून त्रास देत आहेत, टार्गेट करत आहेत, आदिवासीं महिलेचा छळ करत आहेत. माझ्यावर दबाव आणत आहेत, अशी तक्रार सुशीलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर मांडली. माझी मूळ कागदपत्रे जिल्हा परिषदेने अद्यापही दिली नाहीत. जिल्हा परिषद रत्नागिरीला २ लाखांचा दंड झाला आहे. माझा अपिल अर्ज जाणीवपूर्वक अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्याकडे पाठवला नाही. माझी मूळ कागदपत्रे, बीएड्चा प्रस्ताव, शाळेचे अहवाल, अंशदायी पेन्शनचे फॉर्म, माहिती अधिकार अर्ज, वेतनश्रेणीचे प्रस्ताव अशी अनेक कागदपत्रे शिक्षण विभागात गायब केली आहेत. या प्रकरणी चौकशी अहवाल सीईओंकडे सादर करण्यात आला आहे. काही अधिकाऱ्यांनी राजकारणी लोकांना हाताशी धरून माझ्याविरोधात षडयंत्र रचून मला खोट्या व बनावट गुन्ह्यात अडकवून माझे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे, अशी व्यथा सुशीलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पूजार यांच्याकडे मांडली. यावर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT