कोकण

राजापूर-रिफायनरीबाबत आज राजापुरात बैठक

CD

रिफायनरीबाबत आज राजापुरात बैठक
राजापूर, ता. २९ ः प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने शंका आणि प्रश्‍नांचे निरसन करण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्पष्ट केले. त्याप्रमाणे प्रशासनाकडून लोकांशी संवाद साधण्याला सुरवात झाली असून रविवारी (ता. ३०) धोपेश्‍वर आणि बारसू येथील शेतकरी, ग्रामस्थ आणि प्रकल्पविरोधकांशी संवाद साधण्यासाठी प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ वा. नगर पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये ही बैठक होणार आहे. जिल्हाधिकारी देवेंदर सिंग आणि जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुळकर्णी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रांताधिकारी वैशाली माने यांनी दिली. बैठकीला जास्तीस जास्त लोकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गर्दीच्या वेळी CSMT रेल्वे स्थानकात संतापजनक प्रकार! प्लॅटफॉर्ममधील रुळावर व्यक्ती झोपला, समोरून ट्रेन आली अन्...; VIDEO VIRAL

Thane Crime: ठाणे जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी मोहीम, वर्षभरात ७ कोटींचा ड्रग्ज जप्त, १४६ आरोपींना अटक

लग्नाला ११ वर्ष पूर्ण; तरीही पतीसोबत का नाही राहत अमृता खानविलकर? कारण सांगत म्हणाली, 'तो त्याच्या आईजवळ...'

Latest Marathi News Update : भारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X क्रॅश

Thane News: कल्याण–शिळफाटा रस्त्यावरील मेट्रो कामाचे परिक्षण करा, मुलुंड दुर्घटनेनंतर प्रवाशांची मागणी

SCROLL FOR NEXT