कोकण

बारसू रिफायनरी संदर्भात शरद पवारांची भेट घेणार

CD

बारसू रिफायनरी संदर्भात
शरद पवारांची भेट घेणार
पालकमंत्री सामंत ः अडीचणी दूर करून हा प्रकल्प राबवणार
रत्नागिरी, ता. ३० ः राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सोमवारी (ता. १) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरीत शासकीय विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘बारसू येथे प्रस्तावित असणारा हा प्रकल्प स्थानिक लोकांना विश्वासात घेवूनच पुढे जाणार आहे. कोणत्याही प्रकारे टोकाची भूमिका न घेता प्रकल्पाबाबत स्थानिक ग्रामस्थांच्या शंकाचे निरसन करून, शेतकऱ्यांच्या सर्व प्रकारच्या अडीचणी दूर करून हा प्रकल्प राबविला जाईल. या प्रकल्पाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. शिवाय आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी त्यांची भेट घेणार आहे. बारसू येथील हा प्रकल्प समजून घेवून पुढे नेला पाहिजे. उगाचच जुन्या काही गोष्टी दाखवून ग्रामस्थ शेतकऱ्यांची दिशाभूल न करता प्रकल्प समजून घेऊन त्यांच्या शंकाचे निरसन करूनही हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी (ता. ३०) रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या सत्यजित चव्हाण यांनी भेट घेतली. त्या भेटीत श्री. चव्हाण यांनी चर्चा केली. त्यानंतर लगेचच मंत्री सामंत पवार यांच्या भेटीला जाणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

Parineeti Chopra : पतीसाठी परिणीतीच्या लंडनला फेऱ्या; राघववर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

SCROLL FOR NEXT