कोकण

केंद्रीय संचार ब्युरोद्वारे भाट्ये किनाऱ्यावर योगाभ्यास

CD

rat२p७.jpg
९९८९५
रत्नागिरीः केंद्रीय संचार ब्युरोद्वारे फाटक हायस्कूल येथे आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी विद्यार्थी.
------------
फाटक हायस्कूल, भाट्ये किनाऱ्यावर योगाभ्यास
केंद्रीय संचार ब्युरोः २१ जूनला आंतरराष्ट्रीय योगदिन
रत्नागिरी, ता. २ः केंद्रीय संचार ब्युरोद्वारे फाटक हायस्कूल आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर आयोजित योगाभ्यास कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. येत्या २१ जूनला साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनाला आता ५१ दिवस शिल्लक राहिले आहेत. या निमित्त आंतरराष्ट्रीय योगदिन उलटगणती या कार्यक्रम फाटक हायस्कूल आणि भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर पतंजली योग विद्यापिठाच्यावतीने झाला. योग दिनाचे महत्व लक्षात घेता योग हा काही काळ किंवा एखाद्या महत्वाच्या दिवशी करण्याची कृती नसून दैनंदिन आरोग्य राखण्यासाठी योगासने आणि इतर व्यायामांचे महत्व आहे. हे लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या वेळी योगाभ्यास, योग आधारित प्रश्नमंजुषा, योगविषयी तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले. योग कौशल्य दाखवणाऱ्या योगसाधक, विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमासाठी फाटक हायस्कूल येथे क्षेत्रीय प्रचार अधिकारी महेश चोपडे, फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक किशोर लेले, पतंजलीचे योगतज्ञ भारत सावंत तर भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील कार्यक्रमात क्षेत्रीय प्रचार सहाय्यक प्रमोद खंडागळे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी तथा योगतज्ञ विद्यानंद जोग, महिला पतंजली योग समितीच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्या रमा जोग उपस्थित होते. तत्पूर्वी फाटक हायस्कूलचे विद्यार्थी, शिक्षक आणि केंद्रीय संचार ब्युरो कोल्हापूर कार्यालयाने महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT