कोकण

कुडाळात दोन किलो गांजा जप्त

CD

९९९४२


कुडाळात दोन किलो गांजा जप्त
६३ हजारांचा मुद्देमाल; गुन्हे अन्वेषणची कारवाई
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २ ः शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषणने काल (ता. १) केलेल्या कारवाईत एका दुचाकीस्वाराकडून २ किलो १०३ ग्रॅम गांजा जप्त केला. कारवाईत ६३,०९० रुपयांचा गांजा, ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी, ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट असा एकूण १ लाख ११ हजार ९० रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सायंकाळी ५ च्या सुमारास अनंत मुक्ताई हॉटेलसमोर करण्यात आली.
अधिक माहिती अशी की, येथील अनंत मुक्ताई हॉटेल या ठिकाणी एक व्यक्ती दुचाकीवरून येऊन गांजा विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास मिळाली. त्यावरून सापळा रचून एका दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात आली. दुचाकीच्या डिक्कीतून एकूण २ किलो १०३ ग्रॅम गांजा जप्त केला. संशयित आरोपीविरुद्ध येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कुडाळ पोलिस करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल अनुपकुमार खंडे, कृष्णा केसरकर, प्रकाश कदम, प्रमोद काळसेकर, प्रथमेश गावडे, अमित तेली यांनी केली. संशयिताविरुद्ध गुन्ह्याची फिर्याद प्रमोद काळसेकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT