कोकण

पाच वर्षात राजापुरातील 29 शेतकर्‍यांना विम्याचा लाभ

CD

२३ (टुडे पान २ साठीमेन)

राजापुरातील २९ शेतकऱ्यांना विम्याचा लाभ

४९ लाखाचा मिळाला परतावा ः नैसर्गिक व मानवनिर्मित अपघाते

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ४ ः शेती करताना नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे होणाऱ्‍या अपघातात शेतकऱ्‍याचा मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे. या योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षामध्ये तालुक्यातील २९ आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सुमारे ४९ लाख रुपयांचा लाभ मिळाला आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात व मानवनिर्मित तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात, त्यामुळे शेतकऱ्‍यांचा मृत्यू ओढवतो किंवा काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना गेल्या काही वर्षापासून शासनातर्फे राबवली जात आहे. या योजनेची अंमलबजावणी करताना त्यामध्ये त्रुटी दिसत असल्याने त्या दूर करून नव्या स्वरूपामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्यात येत आहे. गेल्या काही वर्षामध्ये वातावरणामध्ये कमालीचा बदलाव झालेला असून, शेती अन् फळबागायतींसाठी बदललेले वातावरण प्रतिकूल ठरताना दिसत आहे. शेतीसाठी कामगारही उपलब्ध होताना दिसत नाही. या साऱ्‍यातून शेती आर्थिकदृष्ट्या परवडेनाशी झाली आहे. या स्थितीतही शेतीची कास न सोडणाऱ्‍या शेतकऱ्यांसाठी पूर्वीची गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना आणि आताची गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना उपयुक्त ठरताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये तालुक्यातील २९ आपद्ग्रस्त शेतकऱ्‍यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. या कुटुंबीयांना सुमारे ४९ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तालुका कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
--
विमा योजनेचे राजापुरातील लाभार्थी

*वर्ष*लाभार्थी संख्या*मिळालेले अनुदान (लाखात)
*२०१८-०१९*५*५
*२०१९-०२०*४*४
*२०२०-०२१*७*१४
*२०२१-०२२*९*१८
*२०२२-०२३*४*८

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT