कोकण

कुडाळ तालुक्यात विकासकामांचा धडका

CD

swt५१.jpg
००६३७
पोखरणः खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत येथे विकासकामांचा प्रारंभ करताना.

कुडाळ तालुक्यात विकासकामांचा धडका
राऊत, नाईक यांची उपस्थिती; ५१ लाखांच्या कामांची भूमिपूजने
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुसबे, पोखरण, कसाल या गावातील ५१ लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने खासदार राऊत, आमदार नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांच्या मागणीवरून ही विकास कामे मंजूर करण्यात आली असून त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. त्यामध्ये कुसबे मुख्य रस्ता ते नामदेव घाडीगावकर यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुसबे दुरुस्ती करणे निधी ७ लाख, कुसबे मुख्य रस्ता ते नामदेव घाडीगावकर यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर संरक्षण भिंत बांधणे निधी ८ लाख, कसाल मेस्त्रीवाडी ते गोसावी मंदिर रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी ५ लाख, पोखरण धनगरवाडी अंतर्गत रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ८ लाख, पोखरण धनगरवाड़ी येथे स्मशानभुमी येथे बोअरवेल खोदणे १ लाख, पोखरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे सभामंडप बांधणे १० लाख, पोखरण खालचीवाडी टेंबवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ५ लाख, पोखरण जल जीवन मिशन अंतर्गत नळयोजना करणे १.४६ लाख ही कामे मंजूर केली आहेत.
कुसबे येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, माजी महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख सचिन कदम, शाखाप्रमुख राजू घाडीगावकर, सरपंच समीक्षा जाधव, उपसरपंच भाग्यश्री घाडीगावकर, ग्रामपंचायत सदस्य विजय म्हाडेश्वर, आबा मुंज, कुंदे सरपंच रुपेश तायशेटे, भाई म्हाडेश्वर, पांडुरंग तानीवडे, ललित घाडीगावकर, नितीन म्हाडेश्वर, सखाराम घाडीगावकर, विरेश परब, चंद्रकांत घाडीगावकर, सत्यविजय घाडीगावकर, मारुती ताम्हाणेकर, रामचंद्र पिळणकर आदी. कसाल येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, सरपंच राजन परब, अवधूत मालणकर, यशवंत परब, डॉ. बालम, बाळा कांदळकर, पांडुरंग गावडे, गणेश मेस्त्री, अरुण राणे, गिरीश मर्तल, प्रभाकर सावंत, सत्यवान चव्हाण आदी. पोखरण येथे रवी पांगम, शाखाप्रमुख संतोष सावंत, अनिल सावंत, जगदीश सावंत, ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत, संजना सुतार, सविता सावंत, रुपाली गावडे, संदीप गावडे, रमाकांत सावंत, विठ्ठल येडगे, आनंद गावडे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT