कोकण

एनएमएमएस परिक्षेत पाट हायस्कूलचे यश

CD

swt53.jpg
00685
पाटः येथील हायस्कूलच्या नेत्रदिपक यशाबद्दल अभिनंदन करताना मान्यवर.

एनएमएमएस परिक्षेत
पाट हायस्कूलचे यश
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ५ः राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ मध्ये एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व (कै.) सौ. सीताबाई रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय तथा (कै.) डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य, विज्ञान उच्च महाविद्यालयाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. संस्था कार्याध्यक्ष समाधान परब, उपाध्यक्ष दिगंबर सामंत, संस्था सचिव सुधीर ठाकूर, संस्था खजिनदार देवदत्त साळगावकर व सर्व संस्थाचालकांची प्रेरणा व प्रोत्साहन तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर यांचे मार्गदर्शन व प्रशालेतील शिक्षकांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी असे घवघवीत यश संपादन केले आहे.
एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीः तन्मय गोसावी, जयेश निर्गुण, दिनार मयेकर, यश मांजरेकर, मयूर परब, जयवंत कुडव, धनश्री पाटकर, रसिका झाड, पुष्पराज परब, संचिता राऊत, सुश्रुषा परब. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षकांनी पालकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले.
प्रशालेतील नंदिनी बुरुड, प्रगती निवतकर, दीपिका सामंत, सिद्धी चव्हाण, विनायक कांबळे, मारुती सांगळे, सयाजी बोंदर, आनंदा हाक्के, प्रशांत चव्हाण या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षा प्रमुख म्हणून प्रशालेच्या शिक्षिका नंदिनी बुरुड यांनी काम केले. या यशाबद्दल प्रदीपकुमार कुडाळकर शिक्षणाधिकारी (योजना ) यांनी संस्था, विद्यालय, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं अर्धशतक, मिचेलसोबत चेन्नईचा डाव सावरला

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT