कोकण

कोकणच्या मातीला आत्मीयतेचा सुगंध

CD

00969
केर ः फरा आदर्श पत्रकार पुरस्काराने अभिमन्यू लोंढे यांना सन्मानित करताना विद्युत अभियंता प्रवीण परब. शेजारी शिव पारायणकार धर्मराज हांडे महाराज, अच्युत सावंत-भोसले, डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अॅड. सुहास सावंत आदी.


कोकणच्या मातीला आत्मीयतेचा सुगंध

धर्मराज हांडे महाराज; केरमध्ये फ. रा. पुरस्कारांचे वितरण

दोडामार्ग, ता. ६ ः (कै.) फटीराव रामचंद्र देसाई हे आदर्श व्यक्ती होते. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नावे प्रतिष्ठान स्थापन करत असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या पाठीवर पुरस्काररुपी कौतुकाची थाप देत आहेत, ही बाब गौरवास्पद आहे. कोकणातील मातीला जसा सुगंध आहे, तशीच येथील माणसेही गोड आहेत. अशा कार्यक्रमांतून प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांची समाजाप्रती असलेली आत्मीयतेची भावना प्रखरपणे दिसून आली आहे, असे मत शिव शंभू चरित्र व्याख्याते धर्मराज हांडे महाराज यांनी व्यक्त केले.
आदर्श केर-भेकुर्ली गावात फ. रा. प्रतिष्ठानतर्फे १२ व्या वर्षातील पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भोसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, वीज वितरण कंपनी कार्यकारी अभियंता प्रवीण परब, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, डॉ. विद्यानंद देसाई आदी उपस्थित होते.
कार्याध्यक्ष सावंत-भोसले यांनी, फ. रा. प्रतिष्ठान गेले एक तप उत्कृष्ट काम करत असल्याचे सांगून उल्लेखनीय व्यक्तींना पुरस्कार देऊन जो कार्यक्रम आयोजित केला जातो, त्याचे भरभरून कौतुक केले. डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी प्रतिष्ठानने व्याख्याते धर्मराज हांडे महाराजांना आणून अर्धा महाराष्ट्र काबीज केला आहे. येणाऱ्या काही वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र हे प्रतिष्ठान व्यापेल. प्रेमानंद देसाई जे सामाजिक ऋण फेडत आहेत, त्याचे दुसरे मूल्य नाही, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.
यावर्षीचे १४ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शानदार सोहळ्यात प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे मानकरी आदर्श शिक्षक फरा पुरस्कार-वंदना राणे (शाळा कणकवली नंबर २), अध्यापन भास्कर पुरस्कार-स्नेहल गवस (मुख्याध्यापिका), आदर्श पत्रकार-अभिमन्यू लोंढे(सावंतवाडी), नाट्य-रंगकर्मी-शिवप्रसाद उर्फ शिवा मेस्त्री, सौ. हेमावती स्मृती महिला स्वावलंबन पुरस्कार-अर्चना आसोलकर (आसोली), आरोग्य सेवा पुरस्कार डॉ. गोविंद देसाई, स्मार्ट ग्राम पुरस्कार-निरवडे ग्रामपंचायत सरपंच सुहासिनी सुहास गावडे, आदर्श कृषी रत्न पुरस्कार-शिवप्रसाद देसाई (बांदा), आदर्श पत्रकार युवा प्रेरणा पुरस्कार-प्रवीण परब (मडुरा), संगीता शामसुंदर स्मृती आदर्श संगीत पुरस्कार-विश्वासराव देसाई (कळणे), शैला स्मृती आदर्श दिव्यांग पुरस्कार-दशरथ देसाई (केर), आदर्श जनसेवा पुरस्कार-शिवम कोरगावकर यांसह प्रतिष्ठेचा जीवन गौरव पुरस्कार चंद्रकांत उर्फ कांता मेस्त्री (ओटवणे) यांना देण्यात आला. मूर्तिकार कृष्णा कुंभार यांचाही विशेष सन्मान झाला. तेजस देसाई, प्रवीण परब यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. पी. डी. देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

SCROLL FOR NEXT