कोकण

रत्नागिरी- सलग तिसऱ्यांदा ॲड. पटवर्धन बिनविरोध

CD

फोटो ओळी
-rat९p२७.jpg- KOP२३M०१७३० रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अॅड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन करताना मुख्य व्यवस्थापक मोहन बापट आणि सर्व संचालक मंडळ.
----------------

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या
अध्यक्षपदी ॲड. पटवर्धन बिनविरोध
रत्नागिरी, ता. ९ ः येथील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडणुकीनंतर आज संचालक मंडळाची पहिली सभा झाली. त्या वेळी सलग तिसऱ्यांदा ॲड. दीपक पटवर्धन यांची अध्यक्षपदी तर माधव गोगटे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयात मंगळवारी (ता. ९) दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या सभेमध्ये ही निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित संचालक जयप्रकाश पाखरे, प्रसाद जोशी, अजित रानडे, राजेंद्र सावंत, बापट, गोगटे, संतोष प्रभू, शरदचंद्र लेले, प्रदीप कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते. या सर्व संचालक मंडळाने एकमुखाने संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड केली. बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी सुधीर कांबळे यांनी घोषित केले.
सलग तिसऱ्यांदा ॲड. पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून कार्यरत असलेले ॲड. पटवर्धन यांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राचा श्रीगणेशा केला. अनेकविध नवे आर्थिक उपक्रम घेऊन नवनवीन योजना घेऊन स्वामी स्वरूपानंद पतसंस्था ग्राहकांसमोर येईल. एखाद्या आर्थिक संस्थेचे अध्यक्षस्थान सलग २० वर्ष भूषवायला मिळणे, ही गोष्ट खूप बोलकी आणि माझ्यासाठी अमूल्य असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT