कोकण

कचरा टाकण्यावरून नगर पालिका कर्मचाऱ्यांशी बाचाबाची

CD

२८ (पान ३ साठी)

पालिका कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची

कचरा टाकण्याचे कारण ; पोलिस ठाण्यात माफीनामा दिल्यावर पडदा

चिपळूण, ता. ९ ः शहरातील नगर पालिकेच्या शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात जाण्यास मज्जाव असताना परजिल्ह्यातील एकाने जाऊन कचरा टाकला. परत येताना त्याची गाडी अडवण्यात आली असता पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधिताने अधिकारी व कर्मचाऱ्यांशीच बाचाबाची केली. अखेर हा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला व तेथे माफीनामा दिल्यावर या वादावर पडदा पडला. ही घटना सोमवारी (ता. ८) दुपारी घडली.
बहादूरशेख नाका येथे एक जाहिरात कंपनी आहे. गाड्यांवर फ्लेक्स लावून ती मागणीनुसार फिरवली जाते. असेच जुने काढलेले फ्लेक्स कचऱ्यात टाकण्यासाठी मालकाने सांगितले. कचरा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने हा मार्ग सध्या बंद करण्यात आला असून, त्याची कल्पना प्रसारमाध्यमांद्वारे नागरिकांना दिलेली आहे. असे असताना परजिल्ह्यातील या कामगाराने गाडी कचरा प्रकल्पाकडे नेली. काही कर्मचाऱ्यांनी जाताना त्याला सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना त्याने दाद दिली नाही. कचरा टाकून दुपारी खाली येताना शिवाजीनगर येथे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याला अडवले व जाब विचारला. याचा राग आल्याने त्या कामगाराने पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाच धमकावले व वाद घातला. अखेर सर्व अधिकारी व कर्मचारी त्याला घेऊन पोलिस ठाण्यात पोहोचले. पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी वस्तुस्थिती समजून घेतली व संबंधित कामगाराला चांगलेच सुनावले. तो गयावया करू लागला. अखेर पोलिस ठाण्यात माफीनामा दिल्यावर या वादावर पडदा पडला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचा फेक फोटो व्हायरल; स्वतःच सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT