कोकण

शिक्षक भारतीचे कराड प्राथमिक शिक्षक समितीत

CD

01966
कुडाळ : लक्ष्मीकांत कराड यांना प्राथमिक शिक्षक समितीत प्रवेश देताना राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर. शेजारी जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, सचिव सचिन मदने आदी.

शिक्षक भारतीचे कराड
प्राथमिक शिक्षक समितीत
ओरोस, ता. १० ः शिक्षक भारतीचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कराड यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत जाहीर प्रवेश केला.
प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य व सर्वसामान्य शिक्षक बांधवांवरील अन्यायाविरोधात आवाज उठविण्याच्या कार्यकुशलतेवर प्रभावित होऊन प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा जिल्हा परिषद शाळा शर्ले नं. १ चे (ता. सावंतवाडी) उच्चश्रेणी मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड यांनी सावंतवाडी येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीत राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर व जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, माजी राज्य सहसचिव तथा पतपेढी अध्यक्ष नामदेव जांभवडेकर, पतपेढी संचालक दिनकर तळवणेकर, कुडाळ तालुका उमेदवार विजय सावंत, एकनाथ सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. या वेळी प्राथमिक शिक्षक समितीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष समीर जाधव, सावंतवाडी तालुका उमेदवार गोविंद शेर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत मडगावकर, तालुका शिक्षक नेते सतीश राऊळ, दिलीप चव्हाण, उदेश नाईक, मंगेश ठाकूर, अरविंद कुडतरकर, प्रसाद डेगवेकर, सुनील जाधव आदी उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक समितीचा शिलेदार म्हणून कार्यरत राहणार असल्याचे कराड यांनी सांगितले. कराड यांचा शिक्षक समितीत योग्य सन्मान केला जाईल, असे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT