कोकण

गुहागर-पाटपन्हाळेत दुभाजकावर आपटली कार

CD

rat१०p१७.jpg
०१९९८
गुहागरः दुभाजकावर मोटार आदळल्याने झालेले नुकसान.
------------
पाटपन्हाळे येथे दुभाजकावर आदळली मोटार
दगडोबा स्थानाजवळ घटना; वाहनातील सर्वजण सुखरुप
गुहागर, ता. १० : तालुक्यातील पाटपन्हाळे येथे महामार्गावरील दगडोबा स्थानाजवळील दुभाजकावर बुधवारी (ता. १०) सकाळी ६.३० च्या दरम्यान मोटार आदळून अपघात झाला. सुदैवाने वाहनांमधील पाचही जण वाचले आहेत. या अपघाताची नोंद गुहागर पोलिसामध्ये वाहन मालक विजय शांताराम दणदणे (रा. गोरेगाव, मुंबई) यांनी केली आहे.
विजय दणदणे हे मुंबईहून मंगळवारी (ता. ९) रात्री दहा वाजता मोटारीने (एमएच-४७-एन-०७२८) अडूर पड्याळवाडीला येण्यासाठी निघाले. बुधवारी (ता. १०) सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावर शृंगारतळी सोडल्यानंतर पाटपन्हाळे येथील दगडोबाजवळ ते पोचले. येथे महामार्गाचे एक दिशा मार्ग असलेले दोन स्वतंत्र रस्ते आहेत. ते समजण्यासाठी दुभाजक बसविले आहेत. याठिकाणी वाहन आले असता समोरुन येणाऱ्या बैलाला वाचवताना विजय दणदणे यांचे वाहन दुभाजकावर आदळले. ही धडक इतकी भीषण होती की दुभाजकाचा पन्हळी पत्रा थेट वाहनात घुसला. परंतु सुदैवाने वाहनातून प्रवास करणारे विजय दणदणे, राजेश शांताराम दणदणे, विजया विजय दणदणे, प्रज्ञा विजय दणदणे, नाना रूपा हळये हे पाचहीजण सुखरूप वाचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT