कोकण

राजापूर - अद्ययावत तंत्रज्ञानाने रेशीम शेतीचे उत्पादन वाढेल

CD

फोटो ओळी
-rat११p३२.jpg ःKOP२३M०२१०० रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग करणारे शेतकरी वासुदेव घाग, अमर खामकर, राजाराम पाटेकर, हनुमंत विचारे, सुधीर पालकर यांचा सत्कार करताना रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे.


अद्ययावत तंत्रज्ञानाने रेशीम शेतीचे उत्पादन वाढेल
--
महेंद्र ढवळे ; राजापुरातील रेशीम शेतीची पाहणी आणि मार्गदर्शन
राजापूर, ता. ११ ः रेशीम शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत निर्माण करण्याची ताकद आहे. त्याला रेशीम शेतीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास अधिक उत्पादन अन् उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे कोकणातील जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांनी रेशीम शेतीकडे वळून जास्तीत जास्त क्षेत्र रेशीम शेती क्षेत्राखाली आणावे, असे आवाहन नागपूर येथील राज्याच्या रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.
कोकणातील शेतकऱ्‍यांनी राजापूर-लांजा रेशीम शेतकरी समूह गटाच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन रेशीम शेतीचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल विशेष कौतुकही केले. या वेळी थेट शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी रेशीम शेतीसंबंधित शेतकऱ्‍यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांनी सेवानिवृत्त रेशीम अधिकारी रमेश हांडे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या रेशीम शेती केली आहे. या शेतकर्‍यांची ढवळे यांनी भेट घेतली. सौंदळ येथील प्रगतशील शेतकरी आणि माजी सैनिक वासुदेव घाग यांच्या निवासस्थानी झालेल्या छोटेखानी बैठकीमध्ये ढवळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. या वेळी कोल्हापूरचे रेशीम विस्तार अधिकारी कांबळे, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक डॉ. भगवान खंडागळे, गडहिंग्लजचे रेशीम विस्तार अधिकारी अनिल संकपाळ, सांगली येथील वरीष्ठ क्षेत्रसहाय्यक सुनील पाटील, दापोली कृषी विद्यापिठाच्या लांजा येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. सुदेश चव्हाण, डॉ. महेश महाले, डॉ. संदीप देशमुख, राजापूरचे कृषी अधिकारी सुहास पंडित, विस्तार अधिकारी प्रभाकर आपटे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
रेशीम शेतीविषयक भविष्यामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाल्यास त्वरित आपल्याशी संपर्क साधण्याचेही त्यांनी शेतकर्‍यांना सुचित केले. या वेळी शेताच्या बांधावर जाऊन त्यांनी तुतीच्या बागेमध्ये खत, पाण्याचे नियोजन कसे करावे, पिशवीमध्ये तुतीच्या रोपांची निर्मिती कशी करायची यासंबंधी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. रेशीम शेतीची यशस्वी लागवड करणारे वासुदेव घाग, अमर खामकर, हनुमंत विचारे, हरिश्चंद्र पाटेकर आणि सुधीर पालकर या शेतकऱ्‍यांचा ढवळे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR Live Score: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT