४१ वाहन चालकांना
३१ हजाराचा दंड
कणकवली, ता. ११ : गेल्या तीन दिवसात कणकवली पोलिसांनी वाहन चालवताना मोबाईलवर संभाषण, सीट बेल्ट न लावणे, लायसन न बाळगणे यासह अन्य कारणाखाली तब्बल ४१ वाहन चालकांवर ३१ हजारांची दंडात्मक कारवाई केली.
कणकवली पटवर्धन चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्याअनुषंगाने पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली. यात ८ मे रोजी ६ वाहन चालकांकडून ३ हजार ५०० रुपये, ९ मे रोजी २७ वाहन चालकांवर कारवाई करत १९ हजार ५०० रुपयांचा दंड तर १० मे रोजी ८ वाहन चालकांवर ८ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे गेल्या दोन दिवसात काही प्रमाणात कणकवली शहरातील सर्विस रोडवरील वाहतूक कोंडीची समस्या कमी झाल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या सातत्याच्या कारवाईमुळे बहुतांश वाहने फ्लाय ओव्हर ब्रिज खालील मोकळ्या जागेतही पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी झाली आहे. दरम्यान सर्वसामान्य प्रवासी आणि जनतेची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी पोलिसांकडून सातत्यपूर्ण कारवाई ठेवण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.