कोकण

वेंगुर्लेतील विकासकामांसाठी ३९ कोटी

CD

02360
दीपक केसरकर

वेंगुर्लेच्या विकासासाठी ३९ कोटी

मंत्री केसरकरांचे प्रयत्न; वालावलकरांचा यशस्वी पाठपुरावा

वेंगुर्ले, ता. १२ ः राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे सत्ताधारी आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून व शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने वेंगुर्लेच्या विविध स्वरूपाच्या विकासकामांसाठी ३९ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. यातील अनेक कामे प्रगतीपथावर आहेत, अशी माहिती शिवसेना पक्षाचे वेंगुर्ले शहर प्रमुख उमेश येरम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील सप्तसागर कॉम्प्लेक्समधील तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेतर्फे पत्रकार परीषद आयोजित केली होती. यावेळी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजेरकर, माजी नगराध्यक्ष सुनिल डुबळे, शहरप्रमुख येरम आदी उपस्थित होते.
श्री. येरम म्हणाले, ‘‘मंत्री केसरकरांनी वर्षभरात वेंगुर्ले शहराच्या विकासाचे व्हीजन समोर ठेवून मंत्री व सत्ताधारी आमदार म्हणून मिळणाऱ्या विविध हेडखाली फार मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आहे. यात वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील पाणी पुरवठा योजनेकरिता ३ कोटी १ लाख ५३ हजार ४०० रुपये मंजूर असून यात पाण्याची पाईप लाईन बदलणे व मिटर बसवणे या कामांचा समावेश आहे. विशेष रस्ता अनुदानमधून ६ कोटी १९ लाख २७ हजार १२५ रुपये मंजूर असून शहरातील सर्व रस्त्यांची कामे सुरू झालेली आहेत. वैशिष्ट्यपूर्ण विशेष अनुदानमधून ८ कोटी ७१ लाख २३ हजार ३०७ रुपयांचा निधी मंजूर आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगराध्यान महाअभियान यामधून ३ कोटी ९२ लाख रूपयांचा निधी मंजूर आहे. आमदार स्थानिक विकास फंडातून ५५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘वेंगुर्ले बंदर झुलत्या पुलापासून बंदरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यवर्तीपासून समुद्राच्या दिशेने रोडवायडींग, सायकलींग ट्रॅक, वॉकींग ट्रॅक व फुडमॉल तयार करणे या महत्वपूर्ण विकासकामासाठी १५ कोटी ३६ लाख रूपये मंजूर आहेत. वेंगुर्ले बंदर ते झुलता पूलपर्यंत रस्ता डांबरीकरणासाठी पर्यटन हेडमधून ७५ लाख मंजूर झाले आहेत. पर्यटन हेडमधून रामेश्वर देवस्थान सुशोभिकरणासाठी ३५ लाख पहिल्या टप्प्यासाठी मंजूर असून त्याचे कामही सुरू झाले आहे. पर्यटन वाढीसाठी सिंधुरत्न विकास योजनेतून मानसी गार्डन ते मांडवी खाडीपर्यंत सायकलींग ट्रॅक, वॉकींग ट्रॅक व इतर सुविधांसाठी तसेच बचतगटातील महिलांना स्वयंरोजगारासाठी भरीव आर्थिक तरतूद केली आहे. वडखोल येथील धरणग्रस्त लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी विहिरीवर पंप बसविण्यासहित इतर कामांसाठी २० लाख, दाडाचे टेंब ते पंप हाऊसपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण आणि स्मशानभूमीच्या ठिकाणी संरक्षक भिंत यासाठी ३५ लाख, कुबलवाडा ते गणेश हार्डवेअर दुकानापर्यंतचा रस्ता ३५ लाख, कॅम्प म्हाडा येथे एक लाख लिटर पाण्याची टाकीसाठी २५ लाख, सातेरी मंदिर ते शासकीय गोदामपर्यंतचा रस्ता सिमेंट करणे १५ लाख, मल्टीपर्पज हॉलमध्ये सुविधेच्या दृष्टीने जनरेटर बसवण्यास ३२ लाख, मांगले यांचे घर ते सातेरी मंदिर रामदास परब यांच्या घरापर्यंतच्या गटाराचे आरसीसी कामासाठी २५ लाख प्राप्त झाले असुन त्याची निवीदा प्रक्रियाही झालेली आहे. वडखोल येथे सागर गावडे घरापर्यंत रस्ताच्या ठिकाणी अत्यावश्यक असणाऱ्या संरक्षक भिंतीसाठी ४५ लाख प्राप्त असून हे काम सुरु झाले आहे. दोन टेनलेस्टील टॉयलेट मंत्री केसरकर यांच्या प्रयत्नातून २५ लाखाच्या निधीतून कँम्प स्टेडियम व मानसी गार्डन येथे बसविण्यात आले आहेत. २० लाखाच्या निधीतून कचरा गोळा करणाऱ्या ५ चारचाकी, २ ऑटो टीपर व १० लाख रुपयांच्या निधीतून दोन टॅक्टर प्राप्त झाले आहेत, अशी माहिती श्री. येरम यांनी यावेळी दिली.
----------
चौकट
वेंगुर्लेस गतवैभव ः वालावलकर
दोन वर्षांच्या कालावधीत वेंगुर्ले नगरपरिषदेवर कौन्सिल बॉडी कार्यरत नाही तर प्रशासकाचा कारभार असल्याने वेंगुर्लेच्या विकासाकडे लक्ष असलेल्या शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या भागाचा आमदार व लोकप्रतिनीधी म्हणून प्रशासक, सावंतवाडी प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांनी शहर सौदर्यीकरण स्पर्धेबाबत केलेल्या सुचनांमुळे प्रशासनाकडून केलेल्या कामांमुळे सौदर्यीकरण स्पर्धेत वेंगुर्ले नगरपरिषद अव्वल ठरली आहे. केसरकर यांचेही त्यात योगदान आहे. त्यांच्या निधीमुळे वेंगुर्लेत झालेली आणि होत असलेली पर्यटनपुरक विकास कामे वेंगुर्लेस गतवैभव प्राप्त होईल, असे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी यावेळी सांगितले.
--------------
पाणी टंचाई प्रश्न मार्गी
मंत्री केसरकर यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतील वेंगुर्ले-भटवाडी येथे साकारलेल्या विहिरीचे व पाण्याच्या टाकीच्या कामाचे तसेच निशाण तलाव धरण उंची वाढविण्याच्या कामांचे लोकार्पण अलिकडेच झाले आहे. त्यामुळे शहरातील उन्हाळी पाणीटंचाई पाणी टंचाईचा प्रश्न मिटलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

AIMIM Chief Asaduddin Owaisi: 'मुस्लिम सर्वात जास्त वापरतात कंडोम....', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी असे का म्हणाले?

Ban vs Ind 1st T20 : भारताची विजयाने सुरुवात! मायदेशात बांगलादेशने पत्करली शरणागती; टी-20 मालिकेत 1-0 आघाडी

Alien Life : पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठ्या ग्रहावर एलियन्स असण्याचे संकेत; जेम्स वेब टेलिस्कोपच्या मदतीने घेणार शोध

Share Market Opening: शेअर बाजारात आठवड्याची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीत

SCROLL FOR NEXT