कोकण

खेड ः कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या उशिरा

CD

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या उशिरा
खेड, ता.१२ ः कोकण रेल्वेच्या मडगाव आणि सावंतवाडीतून गाड्या उशिरा सोडण्याच्या कोकण रेल्वेच्या निर्णयाचा खेड, महाड आणि माणगाव तालुक्यांना फटका बसत असून प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेने जानेवारी २०२३ पासून २०११२ मडगाव मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस व ७ एप्रिलपासून ११००४ सावंतवाडी-दादर तुतारी एक्स्प्रेसच्या मडगाव/सावंतवाडी येथून सुटण्याच्या वेळा पूर्वीच्या वेळेपेक्षा एक तास उशिराने केल्या आहेत. मूळ नियोजनानुसार दोन्ही गाड्या खेडला पूर्वीच्याच वेळेत येणे अपेक्षित होते; परंतु परंपरेनुसार रेल्वेला वेळापत्रक पाळता येत नाही व या गाड्या आता खेडला रात्री १.३० नंतर, वीरला रात्री २.३० व माणगावला साधारण ३ वाजता येतात.
सावंतवाडी दिवा व मांडवी एक्स्प्रेस गेल्यानंतर खेड, वीर, माणगावला संध्याकाळी ५ नंतर एकही नियमित दैनिक गाडी उपलब्ध नाही. नेहमी धावणाऱ्या कोकणकन्या आणि तुतारी एक्स्प्रेस पकडण्यासाठी ग्रामीण भागातील लोकांना संध्याकाळी ६ पासूनच स्टेशनला येऊन बसावे लागते. १२.३० पर्यंत अपेक्षित असणाऱ्या गाड्या रात्री १.३० पर्यंत येतच नाहीत. यात सर्वच प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे रेल्वेने पर्यटकांच्या रात्रीच्या प्रवासाची सोय करतानाच स्थानिक (विशेषतः रत्नागिरीच्या उत्तरेकडील) प्रवाशांचीही मानवतेच्या दृष्टिकोनातून काळजी करावी, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : पुणे शहरासाठी रवींद्र धंगेकर यांचा स्वतंत्र जाहीरनामा; नवीन आश्वासनं कोणती?

Gold Rate Today: सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; काय आहे या वाढीमागचे कारण?

Jalgaon NEET Exam : 40 अंश तापमानात ‘नीट’ परीक्षेने काढला भावी डॉक्टरांचा घाम; पालकांचीही कसोटी

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT