कोकण

आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष

CD

३२ (पान ३ साठी)

आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष

चिपळूण पालिका ; सर्व खात्यांची आढावा बैठक

चिपळूण, ता. १२ ः शहरात पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन आतापासून कामाला लागले आहे. वाशिष्ठी व शविनदीतील गाळ काढल्याने पुराची तीव्रता कमी वाटत असली तरी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपत्ती व्यवस्थापनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पालिकेतील सर्व खात्यांचा सविस्तर आढावा घेतला.
पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तयारी, त्यासाठीचे नियोजन, उपाययोजना आदींबाबत माहिती घेताना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या. पुढील महिन्यात बचावकार्याचे प्रशिक्षण व लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संघटना, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्याचाही निर्णय आढावा बैठकीत झाला.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदतकार्य कसे पोहोचवता येईल, होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी पालिका आतापासूनच अलर्ट झाली आहे. नागरिकांना आपत्तीचा संदेश देणारी शहरातील विविध ठिकाणची पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, सायरन यंत्रणा, तीन इंजिन बोटी, पाच फायबर बोटी, वाहने, वॉकीटॉकी, मोबाईल यांच्यासह बचावकार्यासह वापरण्यात येणाऱ्या वस्तू व साहित्य सुस्थितीत आहेत की नाही याचीही माहिती घेण्यात आली. धोकादायक घरे, इमारतींना नोटीसाही काढण्यात आल्या. या वेळी उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------
कोट
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आढावा बैठक झाली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी संबंधित विभागप्रमुख, पथक प्रमुख, कर्मचारी यांना योग्य त्या सूचना केल्या असून सर्व यंत्रणा आजही अलर्ट आहे.
- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT