कोकण

आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष

CD

३२ (पान ३ साठी)

आपत्ती व्यवस्थापनावर विशेष लक्ष

चिपळूण पालिका ; सर्व खात्यांची आढावा बैठक

चिपळूण, ता. १२ ः शहरात पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन आतापासून कामाला लागले आहे. वाशिष्ठी व शविनदीतील गाळ काढल्याने पुराची तीव्रता कमी वाटत असली तरी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी आपत्ती व्यवस्थापनांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी पालिकेतील सर्व खात्यांचा सविस्तर आढावा घेतला.
पावसाळापूर्व व पावसाळ्यानंतरची तयारी, त्यासाठीचे नियोजन, उपाययोजना आदींबाबत माहिती घेताना त्यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना केल्या. पुढील महिन्यात बचावकार्याचे प्रशिक्षण व लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संघटना, मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्याचाही निर्णय आढावा बैठकीत झाला.
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालीच तर त्याला कशा प्रकारे सामोरे जावे, वेळीच मदतकार्य कसे पोहोचवता येईल, होणारे नुकसान कसे टाळता येईल यासाठी पालिका आतापासूनच अलर्ट झाली आहे. नागरिकांना आपत्तीचा संदेश देणारी शहरातील विविध ठिकाणची पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, सायरन यंत्रणा, तीन इंजिन बोटी, पाच फायबर बोटी, वाहने, वॉकीटॉकी, मोबाईल यांच्यासह बचावकार्यासह वापरण्यात येणाऱ्या वस्तू व साहित्य सुस्थितीत आहेत की नाही याचीही माहिती घेण्यात आली. या वेळी उपमुख्याधिकारी बाळकृष्ण पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
--------
कोट
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनांतर्गत आढावा बैठक झाली. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी संबंधित विभागप्रमुख, पथक प्रमुख, कर्मचारी यांना योग्य त्या सूचना केल्या असून सर्व यंत्रणा आजही अलर्ट आहे.
- प्रमोद ठसाळे, प्रशासकीय अधिकारी
-----------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT