कोकण

ग्लोबल फाउंडेशनतर्फे मडुऱ्यात संगणकाचे धडे

CD

02465
मडुरा ः हायस्कूलमध्ये ग्लोबल फाऊंडेशनमार्फत संगणक प्रशिक्षण देण्यात आले.


ग्लोबल फाउंडेशनतर्फे
मडुऱ्यात संगणकाचे धडे
बांदा, ता. १२ ः ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी संस्थेमार्फत मडुरा हायस्कूल येथे पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दहा दिवसीय संगणक प्रशिक्षण आयोजित केले होते. या प्रशिक्षणाचा ५४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. तज्ज्ञ मार्गदर्शक स्वप्निल नाईक व प्रथमेश परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आधुनिक पिढी ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गगन भरारी घेत आहे; मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण मिळणे दुरापास्त होत असते. पिंगुळीची ग्लोबल फाउंडेशन संस्था मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण देऊन नवी झेप घेण्यासाठी पंखांमध्ये बळ देणारी आहे, असे प्रतिपादन यावेळी न्यू इंग्लिश स्कूल मडुरा प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर यांनी केले.
हर्षदा नाईक, निधी किडजी, तन्वी मेस्त्री, स्नेहा केरकर, खुशी पेडणेकर, रिद्धिमा नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण भागातीलच विद्यार्थी कोणत्याही प्रलोभनाशिवाय उत्तम शिक्षण घेत आहेत. यांचे जीवन उज्वल नक्कीच आहे. काही तंत्रज्ञानाच्या सोयीसुविधा यांचा अभाव आहे. ग्लोबल फाउंडेशन ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. विद्यार्थ्यांनी संवादांमधून संपर्क वाढवत राहिला पाहिजे, असे मार्गदर्शन ग्लोबल फाउंडेशनचे संचालक प्रसाद परब यांनी केले. मराठी साहित्यातील मनातील भावनांना स्पर्श करणारा ‘मना दर्पणा’ मंजुश्री विजय वालावलकर व ‘आरसा’ हा ललित लेख भाग्यश्री धुरी हिने सादर करून श्रोत्यांना प्रभावित केले. पियू नाईक व जानवी पंडीत यांनी सूत्रसंचालन केले. ग्रंथपाल प्रतिभा सावंत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT