कोकण

कर्नाटक निवडणूक यशामुळे मालवणात काँग्रेसचा जल्लोष

CD

02595
मालवण ः कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेसच्यावतीने शहरात फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. (छायाचित्र ः प्रशांत हिंदळेकर)

कर्नाटक निवडणूक यशामुळे
मालवणात काँग्रेसचा जल्लोष
मालवण : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपला पराभवाचा धक्का देत मोठ्या विजयाकडे वाटचाल केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात सर्वत्र काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत भरड नाका येथे फटाके फोडून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी, युवक माजी अध्यक्ष देवानंद लुडबे, श्रेयस माणगावकर, मधुकर लुडबे, पराग माणगावकर, संदेश कोयंडे, बाबू गावकर, योगेश्वर कुर्ले, गणेश पाडगावकर, सरदार ताजर, कुडाळ- मालवण विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी पल्लवी तारी, लक्ष्मीकांत परुळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, दिलीप तळगावकर आदी उपस्थित होते.
................
02590
सावंतवाडी ः कर्नाटकातील विजयामुळे येथे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

सावंतवाडीत काँग्रेसचा आनंदोत्सव
सावंतवाडी ः कर्नाटकातील निवडणुकीत काँग्रेसच्या मोठ्या आघाडीमुळे भाजप दारुण पराभवाच्या छायेत असल्याने येथील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उभाबाजार येथे मसूरकर दुकानाच्या शेजारी छत्रपती शिवाजी पुतळ्यानजीक त्याचबरोबर शहरात ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा केला. यावेळी ज्येष्ठ काँग्रेस पदाधिकारी राजू मसूरकर, युवा नेते समीर वंजारी व सर्व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT