कोकण

तळेरेत देव गांगेश्वराचा वर्धापन

CD

02665
तळेरे ः श्री देव गांगेश्वर मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आकर्षकरित्या सजविलेली श्रींची मूर्ती.

तळेरेत देव गांगेश्वराचा वर्धापन
तळेरे : गावचे ग्रामदैवत श्री देव गांगेश्वर-खर्जादेवी मंदिराचा वर्धापन दिन आज भक्तिमय वातावरणात झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. भाविकांनी मोठ्या संख्येने श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. श्री देव गांगेश्वर, खर्जादेवी व म्हारकी मंदिराला पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त सकाळी श्री देव गांगेश्वर, खर्जादेवी व म्हारकी देवतांचा अभिषेक, आरती व स्थानिक भजने, दुपारी श्री खर्जादेवी व म्हारकी देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम, त्यानंतर महाप्रसाद व दिवसभर भजने सादर झाली. श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे गावठण, श्री ब्राम्हणदेव प्रासादिक भजन मंडळ तळेरे-रघुचीवाडी, चाफार्डेवाडी भजन मंडळ, जय हनुमान प्रासादिक भजन मंडळ तळेरे वाघाचीवाडी, बुवा विकास नर व बुवा अजित गोसावी यांची सुस्वर भजने सादर झाली. रात्री दहा नंतर पालखी प्रदक्षिणा कार्यक्रमाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---
02666
मालवण ः ग्रामीण रुग्णालयात परिचारिका दिन साजरा करण्यात आला.

मालवणात परिचारिका दिन उत्साहात
मालवण : येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (ता. १२) परिचारिका दिन साजरा झाला. यावेळी रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिकांना शुभेच्छा देण्यात आल्या. वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. सी. पळसंबकर, डॉ. अनिरुद्ध मेहंदळे, डॉ. गावकर, परिचारिका एस. एम. देसाई, डी. डी. कुबल, एस. एम. जाधव, एस. ए. वेंगुर्लेकर, श्रीमती पी. चव्हाण, आरोग्यसेवक चांदोसकर, भीमसेन कोरडे, डायलिसिस तंत्रज्ञ आर. यू. साबळे, मिलिंद चव्हाण, समुपदेशक पेडणेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chitra Wagh: ठाकरे गटाच्या जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारचा वापर? चित्रा वाघ यांनी फोटो दाखवत केले गंभीर आरोप

Mahesh Manjrekar : स्वातंत्र्य वीर सावरकर, रणदीपचा हस्तक्षेप आणि मतभेद ; मांजरेकरांनी अखेर सोडलं मौन

Zimbabwe: झिम्बाब्वेने तयार केलं नवं चलन; पण सरकारी खात्यांमध्येच चालेनात नोटा, जनताही नाराज, काय आहे कारण?

T20 World Cup Team India : टी-20 वर्ल्ड कपचे शेर IPL मध्ये ढेर, संघात स्थान मिळताच 'हे' 6 भारतीय खेळाडू ठरलं फ्लॉप

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

SCROLL FOR NEXT