कोकण

पान एक-इन्सुलीत 58 लाखाची दारु जप्त

CD

swt१४२५.jpg मध्ये फोटो आहे
इन्सुली ः येथे कारवाई करत पकडलेल्या मुद्देमालासह उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी व कर्मचारी.
(छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

इन्सुलीत ५८ लाखांची दारू जप्त
चालकाचे पलायन ः उत्पादन शुल्कची सर्वात मोठी कारवाई
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ ः गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली. यामध्ये ५८ लाखांच्या दारूसह ७० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता. १३) रात्री उशिरा इन्सुली तपासणी नाक्यावर केली. राज्य उत्पादन शुल्क खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बेकायदा दारू वाहतुकीविरोधातील केलेली ही आजची सर्वात मोठी कारवाई आहे.
उत्पादन शुल्क खात्याचे सिंधुदुर्ग अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. वाहनामध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ११०० कागदी पुठ्याचे बॉक्स आढळले. गाडीमध्ये मिळालेल्या कागदपत्रामधील तपशिलानुसार वाहन मालक विनोद पद्मनाथ राव (रा. पनवेल, जि. रायगड) व फरार संशयित अज्ञात वाहन चालकांवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुरू होती. रात्री उशिरा सहाचाकी ट्रक (एमएच ०४ जीआर ७३२८) तपासणी नाक्यावर तपासणीसाठी थांबविण्यात आला. ट्रकच्या पाठीमागील हौद्यात गोवा बनवटीच्या दारूच्या विविध ब्रँडचे खोके बेकायदा आढळले. पथकाने तब्बल ५८ लाख ८ हजार रुपये किमतीचे १ हजार १०० कागदी पुठ्ठ्याचे खोके तसेच १२ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ७० लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ट्रकची तपासणी सुरू असताना चालकाने काळोखाचा तसेच महामार्गवरील वर्दळीचा फायदा घेत तेथून पलायन केले. या कारवाईमध्ये निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सीमा तपासणी नाका इन्सुली संजय मोहिते, भरारी पथक निरीक्षक संजय दळवी, दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर, तानाजी पाटील, दिवाकर वायदंडे, जमनाजी मानमोड, साहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सूरज चौधरी, रमाकांत ठाकुर तसेच जवान रणजित शिंदे, संदीप कदम, देवेंद्र पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील इन्सुली सीमा तपासणी नाक्याचे दुय्यम निरीक्षक प्रदीप रास्कर हे करीत आहेत.
---------
चौकट
दारू वाहतूक सुरूच
या कारवाईमुळे बेकायदा दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आजच्या कारवाईने गोव्यातून महाराष्ट्र तसेच इतर राज्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा दारू वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांपूर्वीचा पत्रादेवी तपासणी नाक्यावर गोव्याच्या अबकारी खात्याने कारवाई करत लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT