कोकण

Ratnagiri : अवकाळीचा फटका बसलेल्या 12 हजार आंबा बागायतदारांना शिंदे सरकार व्याजमाफी देणार?

सकाळ वृत्तसेवा

राजेश कळंबटे : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - आंबा बागायातदारांना सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफी मिळण्यासाठी जिल्ह्यातील १२ हजार ५१३ कर्जदार बागायतदारांचे प्रस्ताव उपनिबंधक कार्यालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. व्याजमाफीपोटी ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ रुपयांची मागणी केली आहे. या रकमेची तरतुद शासनाला अंदाजपत्रकात करावी लागणार आहे. त्यासाठी मंत्रीमंडळाची मंजुरी अत्यावश्यक आहे.

फेब्रुवारी अखेरीस आणि मार्च महिन्याच्या सुरवातीला २०१४-१५ या वर्षामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाने पूर्ण जिल्हा महसूल विभागाकडून बाधित म्हणून जाहीर केला होता. या हंगामात अनेक शेतकऱ्‍यांची बँक खाती एनपीएत गेल्यामुळे जप्तीच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

तेव्हा बागायतदारांनी कर्जमुक्तीची मागणी केली. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गठन करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही. यासंदर्भात सात वर्षे बागायतदार पाठपुरावा करत होते. ९ फेब्रुवारी २०२३ ला पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सरसकट कर्जावरील तीन महिने व्याजमाफीचे प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा उपनिबंधक विभागाने बँकांकडून आलेल्या माहितीनुसार १२ हजार ५१३ बागायतदारांचे ३ कोटी ३५ लाख ९३ हजार १७८ रुपयांचे प्रस्ताव शासनाला सादर केले आहेत.
याला शासनस्तरावरुन तरतूद करण्याचे आश्‍वासन दोन आठवड्यांपुर्वी रत्नागिरी दौऱ्‍यावर आलेले कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी बागायतदारांना दिले होते. शासनाला प्रस्ताव सादर झालेला असल्यामुळे व्याजमाफी केव्हा होणार याकडे बागायतदारांचे लक्ष लागले आहे.

यंदाचा हंगामही यथातथाच गेल्यामुळे बागायतदार अडचणीत असून बँक कर्ज, औषधांचा खर्च फेडणे अशक्य होणार आहे. या कालावधीत व्याजमाफी झाली तर थोडा दिलासा मिळू शकतो. दरम्यान, शासनाला सादर केलेल्या प्रस्तावात जिल्हा सहकारी बँकेतील ७६७ प्रस्ताव आणि १५ लाख ३४ हजार रुपये, विदर्भ कोकण बँक २ हजार ७४० लाभार्थींचे ४७ लाख १९ हजार ५०८, बँक ऑफ इंडियातील ७ हजार ४९७ लाभार्थींचे १ कोटी ६९ लाख, बँक ऑफ महाराष्ट्रतील ६६९ प्रस्ताव आणि ५१ लाख २७ हजार रुपये, एसबीआयचे ३१७ लाभार्थी आणि २३ लाख ९१ हजार रुपयांचे व्याज माफी करावी लागणार आहे.

४८० लाभार्थींना मिळाली मदत
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने यापुर्वी आंबा बागायतदारांच्या व्यापमाफीचे ५५८ प्रस्ताव शासनाकडे पाठवले होते. त्यातील ४८० लाभार्थींचे ४२ लाख ७९ हजार ३३६ रुपये व्याजापोटी बँक खात्यात जमा केले आहेत. ७८ जणांचे १० लाख ९२ हजार रुपये वितरित करावयाचे शिल्लक आहेत.

व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाला सादर झाला आहे. यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. ही व्याजमाफी मिळावी यासाठी बागायतदारांचे प्रयत्न सुरू आहेत.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायतदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT