कोकण

रत्नागिरी ः जिल्ह्यात उष्माघाताने एकही रुग्ण नाही

CD

जिल्ह्यात उष्माघाताचा
एकही रुग्णाची नोंद नाही

आरोग्य विभाग; उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम

रत्नागिरी, ता. १५ ः जिल्हावासियांना मे महिन्यात प्रचंड उन्हाचा कडाका सहन करावा लागला आहे. अजूनही कोकणातील पाचही जिल्ह्यांत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. सुदैवाने, उष्माघाताने त्रस्त झालेल्या एकाही नागरिकाची नोंद रत्नागिरीत झालेली नाही असे जिल्हा आरोग्य विभागाकडे सांगण्यात आले.
गेल्या तीन आठवड्यांपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवण्यात येत असून, या वर्षात दुसऱ्‍यांदा कोकण किनारपट्टीलगत उष्णतेचे प्रमाण तीव्र झाल्याचे दिसून आले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचे इशारे दिले जात आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा पातळीवरील आरोग्य विभागाकडून मागील महिन्यातच आरोग्य केंद्रे सज्ज ठेवली आहेत. वातानुकूलित यंत्रणांनी सज्ज अशी खोली, औषधे, सलाईन, थंड पाणी उपलब्ध करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या आरोग्ययंत्रणेकडून प्राप्त सुचनेनुसार, दरदिवशी आरोग्य उपकेंद्रांकडून उष्माघाताचा रुग्ण आढळण्याची नोंद घेतली जात आहे.
सुदैवाने, जिल्ह्यात उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. दिवसाच नव्हे तर रात्रीही उष्णतेचा त्रास नागरिकांना जाणवत आहे. शहरी भागात याची तीव्रता अधिक असून, वातानुकूलित वस्तूंचा वापर अधिक वाढला आहे. हवामान विभागाच्या सुचनेनुसार, अजूनही उष्णतेच्या लाटेचा प्रभाव संपलेला नसल्याने सतर्क राहा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडूनही यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत.
०००००००

उष्माघात टाळण्यासाठी हे करावे...

- शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे, विषेशतः अंगमेहनत, व्यायाम करणाऱ्यांनी अधिकाधिक पाणी प्यावे
- सैल व हलक्या रंगांचे कपडे वापरावे
- ११ ते ३ या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळावे
- प्रमाणाबाहेर मद्यसेवन करू नये
- जास्त व्यायाम करू नये
- आहार हलका असावा; पचनास जड, तसेच अति तेलकट व मसालेदार पदार्थ टाळावेत
- कोकम, नारळपानी, ऊसाचा रस, सत्तु आटा, गुलकंद, सब्जा बी, फळे आदींचा अंतर्भाव आहारात उत्तम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : मुकेश कुमारने टीम डेविडचा अडथळा केला दूर; मुंबईचा 6 फलंदाज आऊट

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT