कोकण

फोवकांडा पिंपळपार रस्त्याची दुरवस्था

CD

०३२४७
मालवण ः शहरातील फोवकांडा पिंपळपार ते नाचणोलकर घरापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

फोवकांडा पिंपळपार रस्त्याची दुरवस्था

मालवणवासीय त्रस्त; पावसाळ्यापूर्वी डांबरीकरणाची मागणी

मालवण, ता. १६ : शहरातील फोवकांडा पिंपळपार येथून ग्रामीण रुग्णालयाकडून नाचणोलकर घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्याने वाहतूक करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण व्हावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
फोवकांडा पिंपळपार ते नाचणोलकर घरापर्यंत जाणारा रस्ता शहरातील मेढा भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यास मिळतो. मेढा व राजकोट भागात जाण्यासाठी हाच रस्ता सोयीस्कर ठरतो; मात्र या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खडी पूर्णतः उखडून गेली असून काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या रस्त्यावर भुयारी गटाराचे चेंबर असून त्याच्या सभोवतालचा रस्ता खचून खड्डा पडला आहे. यामुळे उंच-सखलपणा निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याच चेंबरच्या ठिकाणी सायकल व दुचाकीस्वार यांचे अपघातही झाले आहेत; मात्र या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत स्थानिक नागरिकांनी लक्ष वेधूनही नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. याबाबत माजी उपगराध्यक्ष महेश जावकर यांनीही पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मेढा भागातील युवासेना वार्डप्रमुख नीतेश पेडणेकर यांनीही या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सातत्याने आवाज उठविला; मात्र अद्यापही रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यात या रस्त्याची आणखी दुरवस्था होणार आहे. त्यामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक व वाहन चालकांतून केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी तरी या रस्त्याचे डांबरीकरण करून नागरिक व चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT