कोकण

ग्रंथालयीन उपक्रम जनतेपर्यंत पोचवा

CD

03380
मालवण ः ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्याचे उद्‍घाटन जिल्हाध्यक्ष अनंत वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले.

ग्रंथालयीन उपक्रम जनतेपर्यंत पोचवा

सचिन हजारे़; मालवणात ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळावा

मालवण, ता. १७ : ग्रंथालय कर्मचारी व संस्था पदाधिकारी हे ग्रंथालय चळवळीचे महत्त्वाचे घटक आहेत. ग्रंथालय चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी दोघांनी मिळून काम करण्याची गरज आहे. ग्रंथालयांनी नवीन बदलांचा स्वीकार करावा. सामाजिक माध्यमातून ग्रंथालयांचे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन वाचक ग्रंथालयांना मिळणार आहेत, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी आज येथे केले.
येथील पालिकेच्या मामा वरेरकर नाट्यगृह येथे सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचारी स्नेहमेळाव्याचे उद्‍घाटन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांच्या हस्ते झाले. यावेळी कोकण विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मस्के, माजी ग्रंथपाल डॉ. जी. ए. बुवा, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी कृती समिती अध्यक्ष रवींद्र कामत, राजन पांचाळ, अॅड. राजाराम गावडे, ग्रंथालय कर्मचारी मेळावा नियोजन समितीचे अध्यक्ष संजय शिंदे, उपाध्यक्ष अनिल शिवडावकर, पूनम नाईक, कार्यवाह महेंद्र पटेल आदी उपस्थित होते. संजय शिंदे यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा ताण न घेता स्नेहमेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.
डॉ. बुवा म्हणाले, ‘‘शासनाने गाव तिथे ग्रामपंचायत, शाळा, ग्रंथालय अशी घोषणा केली होती. या घोषणेप्रमाणे राज्यातील ग्रामपंचायती भक्कमपणे उभ्या राहिल्या; पण गाव तिथे शाळा व ग्रंथालय यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा नारा, तर दुसरीकडे मराठी शाळांचे भवितव्य अंधःकारमय होताना दिसत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती गावांमधील ग्रंथालयांची आहे. त्यामुळे ग्रंथालये अस्तित्व टिकवण्याची धडपड करीत आहेत. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये पर्यटनविषयक सर्व माहिती उपलब्ध झाल्यास ग्रंथालये पर्यटन केंद्र म्हणून विकसित होतील.’’
रवींद्र कामत म्हणाले, ‘‘ग्रंथालयांना भविष्याचा वेध घ्यायचा असेल, तर त्यांना शासनाच्या अनुदानावर अवलंबून राहून चालणार नाही. त्यासाठी ग्रंथालयांना स्वत:चे उत्पन्नाचे स्रोत निर्माण करावे लागतील. तरच ग्रंथालयांची स्थिती सुधारण्यास मदत मिळेल." जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी शासनाला ग्रंथालय व ग्रंथालय कर्मचाऱ्यांरी यांच्याबाबतीत एक निश्चित धोरण ठरवावे लागेल, याकडे लक्ष वेधले. राजन पांचाळ, मंगेश मस्के यांनी विचार मांडले. ऋतुजा केळकर यांनी सूत्रसंचालन केले. संजय शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पटेल यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT