कोकण

राजापूरला मनरेगाचे शंभर हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट

CD

शंभर हेक्टरवर लागवडीचे
राजापुरात मनरेगाचे उद्दिष्ट
सुहास पंडित; ग्रामपंचायतस्तरावर आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १७ः बेरोजगारांच्या हाताला काम देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गंत (मनरेगा) तालुक्यामध्ये यावर्षी फळबाग लागवड करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान एक हेक्टर याप्रमाणे तालुक्याला शंभर हेक्टरपेक्षा जास्त लागवडीचे उद्दिष्ट ठेवल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी सुहास पंडित यांनी दिली.
फळबाग लागवडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येताना अनेक बेरोजगारांच्या हाताला काम मिळून त्यांना रोजगार मिळणार आहे. त्याला किमान रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गेल्या काही वर्षामध्ये पंचायत समिती, कृषी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावागावामध्ये विविध प्रकारची फळबाग लागवड केली जात आहे. त्याप्रमाणे यावर्षीही मनरेगांतर्गत तालुक्यामध्ये फळबाग लागवड करण्यात येणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान एक हेक्टरप्रमाणे शंभर ग्रामपंचायती मिळून तालुक्याला शंभर हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्याची तालुक्यामध्ये शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने प्रशासन प्रयत्नशील असल्याची माहिती पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी पंडित यांनी दिली.
फळबाग लागवड योजनेची अंमलबजावणी करण्याच्यादृष्टीने ग्रामसेवकांच्या प्रशासकीय पाळीवर आढावा बैठका सुरू झाल्या असून, या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संबंधित ग्रामसेवकांना सूचना पंचायत समितीकडून देण्यात आल्या आहेत. या योजनेची नेमकी कशाप्रकारे अंमलबजावणी करावी या संबंधितही मार्गदर्शन केले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेऊन फळबाग लागवड करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुहास पंडित यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT